SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

..अन्यथा तुम्हालाही भरावा लागेल दंड! ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरलात, तर मग फक्त ‘हे’ काम करा..

भारतात दररोज ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने अनेक जणांना दंड भरावा लागतो. आपल्याकडे वाहन असेल, तर ते चालवताना, बाहेरगावी जायचं म्हटलं तर वाहनाची कागदपत्रं जसे की आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत बाळगणं गरजेचं असतं, अन्यथा वाहतूक पोलिस अधिकारी तुमच्याकडून चलन किंवा दंड आकारू शकतो.

आता आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची दंड भरण्यापासून सुटका होणार आहे. तुम्ही करायचं काय, तर फक्त mParivahan चे ॲप आपल्याजवळ मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहे. या ॲपच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोनमध्येच त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि आरसी (RC) डिजिटल फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतात.

Advertisement

एम-परिवहन (mParivahan) हे ॲप ios आणि android दोन्हीसाठी उपलब्ध आहे व ते App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. या ॲपच्य माध्यमातून आपण आपल्या वाहनाचे प्रत्यक्षात दस्तऐवज न दाखवता ते व्हर्च्युअल स्वरूपात मूळ कागदपत्रांप्रमाणेच दाखवणं पूर्णपणे वैध आहे. मग जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले तर तुम्ही त्यांना या ॲपमध्ये असलेली कागदपत्रे दाखवा.

mParivahan ॲप कसं डाऊनलोड करायचं?

Advertisement

▪️ अँड्रॉइड स्मार्टफोन असणाऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन असणाऱ्यांनी ॲपल स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.

▪️ मग mParivahaan असं सर्च करून ॲप शोधा. मग ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करा.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

व्हर्च्युअल आरसी डाऊनलोड कसे करावे?

▪️ mParivahaan चे ॲप उघडून वरच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन डॉट (.) चिन्हावर क्लिक करा.

Advertisement

▪️ मग तुम्हाला साइन इन पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे.

▪️ आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी (OTP) मिळेल.

Advertisement

▪️ आता तुम्ही या ॲपच्या होमस्क्रीनवर आल्यावर आरसी ऑप्शनवर क्लिक करा.

▪️ सर्च फील्डमध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा.

Advertisement

▪️ ॲपच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डेटा आपोआप सिंक होईल म्हणजेच समोर दिसेल.

▪️ आता ‘Add to dashboard’ वर टॅप करून तुम्ही आरसी (RC) जोडू शकता.

Advertisement

व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड कसं करायचं?

होमस्क्रीनवर असलेल्या आरसी टॅबवर क्लिक करा. आता तुम्हाला सर्च फील्डमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नंबर भरून सर्च करावं लागणार आहे. मग यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सचा सर्व डेटा ॲपमध्ये दिसेल. मग शेवटी फक्त ‘Add to dashboard’वर यावे लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement