SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कसोटी संघाचे कर्णधारपद का सोडलं..? खुद्द विराट कोहलीनेच केला धक्कादायक खुलासा..!

भारताचा आतापर्यंतचा तो सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणजे, अर्थातच विराट कोहली.. 2014 मध्ये कॅप्टन कूल एम. एस. धोनी याच्याकडून विराटकडे कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी आली. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 68 पैकी 40 कसोटी सामन्यात विजय मिळवला नि आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कॅप्टन तो ठरला आहे..

दरम्यान, सुरुवातीला त्याने ‘आयपीएल’मधील बंगळुरु टीम व टी-20 संघाचे नेतृत्व सोडले. नंतर ‘बीसीसीआय’ने त्याची वन-डे टीमच्या कर्णधार पदावरुन हकालपट्टी केली. नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराटने टेस्ट टीमचे कर्णधार पद सोडले..

Advertisement

आता विराट कोहली फक्त एक खेळाडू म्हणून संघात दिसणार आहे. मात्र, त्याच्या कर्णधार पदाने जाण्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. त्याचे कवित्व अजूनही सुरु आहे. विशेषत: टेस्ट टीमचे नेतृत्व त्याने साेडायला नको होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र, आता खुद्द विराटने या साऱ्या बाबींचा खुलासा केला आहे..

विराट काय म्हणाला..?
एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, की “एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की पहिलं म्हणजे काय मिळवायचंय, ते तुम्हाला ठावूक असायला हवं. मग तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहचाल किंवा नाही पोहचणार… प्रत्येक गोष्टीचा एक कार्यकाळ असतो, मुदत असते. त्याची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला जास्त योगदान देऊ शकता…!”

Advertisement

“लीडर बनण्यासाठी तुम्ही कॅप्टनच असायला हवे, असे काही नाही.. धोनी संघात होता, तेव्हा असं नव्हतं, की तो लीडर नव्हता.. कर्णधारपद सोडल्यानंतरही आम्हाला धोनीचा सल्ला लागायचा..! जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय, पण प्रत्येक दिवस सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करु शकता..” असे विराट म्हणाला.

तो म्हणाला, की “पुढे जाणं, त्यासाठी योग्य वेळ निवडणं, हासुद्धा नेतृत्वाचाच एक भाग आहे. तुम्ही वेगळ्या रोलमध्ये राहूनही संघाला तितकचं योगदान देऊ शकता.. धोनीच्या नेतृत्वाखाली मी खेळलो.. कर्णधार झालो. मी संघात एक खेळाडू म्हणून असतानाही कर्णधारासारखाच विचार करायचो. संघ जिंकला पाहिजे, एवढीच माझी भावना होती..!”

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement