SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत ‘हा’ झाला निर्णय, शिक्षणमंत्री का म्हणाल्या, ‘वेट अँड वॉच..?’

राज्यात कोरोना स संसर्गामुळे जानेवारीत शाळा बंद झाल्या होत्या; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-अधिक होत आहे व रिकव्हरी रेट चांगला असल्या कारणाने परीक्षेसंबंधी सकारात्मक बातमी समोर आली आहे. मध्यंतरी शाळा बंद करण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम शिकवून झाला नसल्याने सध्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये बराच गोंधळ आहे. त्यावर स्वतः शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Advertisement

दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती. यावर आपली भूमिका स्पष्ट करत राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असे स्पष्टीकरण रविवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत, त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Advertisement

राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्यावतीने सध्या आम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन निर्णय घेणार आहोत, तोपर्यंत परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाहीये, जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर अकरावीचे प्रवेश झाल्यावर नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे, यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन 10वी-12वी च्या लेखी, प्रात्यक्षिक परिक्षांची तयारी, नियोजन इ. माहीती घेतली. कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याबाबत किंवा परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात 12 वीच्या परीक्षा 4 मार्चपासून तर 10 वीच्या परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement