SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीमुळे ‘सीएसके’ बनला मोठा ब्रॅंड, इंडिया सिमेंटपेक्षाही अधिक ‘मार्केट व्हॅल्यू’..!

भारताचा माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि ‘आयपीएल’मधील ‘सीएसके’ (चेन्नई सुपर किंग्ज) यांच्यात अतूट नाते आहे.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माहीने निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही ‘सीएसके’चे नेतृत्व करतो. चेन्नईच्या मैदानावर खेळूनच ‘आयपीएल’ला ‘राम राम’ करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे..

‘आयपीएल’ मेगा ऑक्शन लवकरच होणार आहे. मात्र, त्याआधीच धोनीच्या ‘सीएसके’ टीमने मोठी कमाल केल्याचे दिसत आहे. ‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेली ‘चेन्नई सुपर किंग्ज’ ही टीम देशातील पहिली ‘स्पोर्ट्स युनिकॉर्न’ टीम ठरली आहे.. शेअर मार्केटमध्ये सध्या ‘सीएसके’ अव्वल ठरली आहे..

Advertisement

‘चेन्नई सुपर किंग्ज’वर ‘इंडिया सीमेंट्स’ची मालकी आहे. मात्र, मार्केट कॅपिटलमध्ये ‘सीएसके’ने ‘इंडिया सीमेंट्स’लाही मागे टाकले आहे.. 28 जानेवारीला शेअर बाजार बंद होताना, ‘इंडिया सिमेंट्स’चे ‘मार्केट कॅप’ 6869 कोटी रुपये होते, तर त्याच वेळी ‘सीएसके’चे ‘मार्केट कॅप’ 7600 कोटी रुपयांवर पोचली आहे. ‘सीएसके’च्या शेअरची किंमत ग्रे मार्केटमध्ये सध्या  210 ते 225 रुपये आहे.

कशामुळे वाढली ‘मार्केट व्हॅल्यू’..?
‘सीएसके’चे ‘मार्केट कॅपिटल’ मूल्य वाढण्यामागे दोन कारणे सांगितली जातात. एक तर या टीमने 2021 मध्ये चौथ्यांदा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवलं. दुसरं कारण म्हणजे, तगडी रक्कम मोजून ‘आयपीएल’मध्ये दोन नवे संघ दाखल झालेत. याचाच अर्थ ‘आयपीएल’ ब्रॅण्डवरील विश्वास वाढला आहे.

Advertisement

‘इंडिया सीमेंट्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मते, “लवकरच ‘सीएसके’ ब्रँड ‘इंडिया सीमेंट्स’च्या ब्रँडच्या पुढे निघून जाईल..!”

चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे शेअर्स 26 ऑक्टोंबर 2021 रोजी ‘अनलिस्टेड मार्केट’मध्ये सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्यावेळी एका शेअरचे मूल्य 110-120 रुपयांवरुन 220 रुपयांवर गेले होते, तर ‘मार्केट कॅपिटल’ 7 हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यावेळी ‘यूनिकॉर्न क्लब’पासून चेन्नईची टीम फक्त 500 कोटी रुपये लांब होती. ‘आयपीएल-2021’च्या ‘फायनल’नंतर फक्त 11 दिवसांत हे घडलं होतं.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement