SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बिग बॉस 15’ ची ‘ही’ अभिनेत्री बनली विजेती! बक्षीस म्हणून मिळाले 40 लाख रुपये..?

देशातील कोट्यवधी फॅन्सची आतुरता आता संपली आहे. कारण बहुचर्चित बिग बॉस 15 सिझनला (Bigg Boss 15) विजेती मिळालीय. अनेक शो आणि मालिकांमधून प्रसिद्ध झालेली तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय.

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) तेजस्वी प्रकाश हिचं नाव जाहीर केलं आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल (Pratik Sehajpal) या दोघांमध्ये जेतेपदाची यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली.

Advertisement

Bigg Boss Season 15 च्या अंतिम पाच स्पर्धकांंमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट व प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले.

तेजस्वीला मिळाली ‘नागिन 6’ ची ऑफर

Advertisement

बिग बॉस 15 ची विजेती ठरलेल्या तेजस्वी प्रकाशला या शोमध्ये असताना नागिन 6 या कार्यक्रमाची ऑफर मिळाली. तर तिला विजेती घोषित झाल्यावर तब्बल 40 लाख रूपये आणि ट्रॉफीही मिळाली आहे. बिग बॉसच्या या 15व्या सिझनमध्ये करण-तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळाली.

तेजस्वीचा अनेक मोठया कार्यक्रमात अभिनय

Advertisement

तेजस्वी प्रकाश हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. स्वरागिनी’पासून ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का 2′ पर्यंत अनेक शोमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. खतरों के खिलाडी 10’ शिवाय ती ‘किचन चॅम्पियन 5’, ‘कॉमिडी नाइट्स लाइव्ह’, ‘कॉमिडी नाइट्स विद कपिल’ आणि ‘कॉमिडी नाइट्स बचाओ’ यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता. तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या दुनियेत येण्याआधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement