SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदार ओळखपत्रातील पत्ता घरबसल्या बदलता येणार..! संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा..

मतदार ओळखपत्र.. प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र.. एक महत्वाचा सरकारी दस्ताऐवज.. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळालाय.. मतदार ओळखपत्रामुळे प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांमध्ये मतदानाची परवानगी दिली जाते. त्याशिवाय मतदान करताना अडचणी येऊ शकतात..

बऱ्याचदा कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.. अशा वेळी आधार कार्ड असो वा मतदार ओळखपत्र अपडेट करणे गरजेचे असते. आपण जिथे राहायला जातो, तेथील कागदपत्रे तयार करणे आवश्यक असते.. ही कागदपत्रे अपडेट केलेली नसल्यास मोठ्या अडचणींना सामाेरे जावे लागू शकते.

Advertisement

विशेष म्हणजे, अगदी घरबसल्या मतदार ओळखपत्रातील पत्ता अपडेट करता येतो.. त्यासाठी काय करायला हवे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

असा करा मतदार ओळखपत्रातील पत्ता अपडेट
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://www.nvsp.in/ वर जा. तेथे तुमचे खाते नसल्यास, लॉगिन स्क्रीनच्या खाली रजिस्टर (Register) पर्यायावर क्लिक करा.
– लॉगिन केल्यानंतर मतदार ओळखपत्रावरील पत्ता बदलण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रात बदल करायचाय की कुटुंबाच्या, हे निवडावे लागेल.

Advertisement

– तुमच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी ‘सेल्फ’ (self) पर्याय निवडा किंवा कुटुंब (Family) निवडा.
– तुमच्या मतदार संघातच जाणार आहात की बाहेरच्या, ते निवडा.
– आता तुमच्या समोर फॉर्म 6 उघडेल. त्यावर तुमचे सध्याचे ठिकाण, पत्ता, मतदारसंघ आणि इतर तपशील भरा. तुमची वैयक्तिक माहिती, पोस्टल पत्ता, कायमचा पत्ता, आदी तपशील भरावे लागतील.

– सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता आणि वयाच्या दाखल्यासह तुमचा फोटो अपलोड करा.
– फॉर्म 6 च्या शेवटी स्वयंघोषणा भरा, कॅप्चा प्रविष्ट करा आणि विनंती सबमिट करा.
– विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल. बदल केल्यानंतर, तुमच्या सध्याच्या पत्त्यावर एक नवीन मतदार आयडी दिला जाईल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement