SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कामाच्या ठिकाणी चोख राहावे लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

वृषभ (Taurus) : शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता.

मिथुन (Gemini) : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.

Advertisement

कर्क (Cancer): आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कौटुंबिक वातावरण तप्त राहू शकते. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

सिंह (Leo) : किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल.

कन्या (Virgo): प्रवासात चोरांपासून सावध राहावे. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Advertisement



तूळ (Libra) : अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल.

वृश्चिक (Scorpio) : पराचा कावळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल.

धनु (Sagittarius) : गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका. सहकार्‍यांशी सलोख्याने वागावे.

Advertisement



मकर (Capricorn) : लहान मुलांच्यात वावराल. जवळचे मित्र भेटतील. अधिकारी लोकांच्या ओळखी होतील. मनाचा विचार महत्त्वाचा ठरेल.

कुंभ (Aquarius) : गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल.

मीन (Pisces) : विषयाच्या मुळाशी जाऊन पहावे. तुमच्या विरोधात काही व्यक्ति वागू शकतात. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Advertisement