SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता तुमचं कार घेण्याचं स्वप्न साकार होणार..! ‘या’ बॅंका देतात अगदी स्वस्त दराने ‘कार लोन’..!

स्वत:चे हक्काचं घर नि त्या घरासमोर उभी असणारी एक चारचाकी.. प्रत्येकाचे हे स्वप्न असते, परंतु घरखर्च, वाढती महागाई, अपुरे वेतन आदी कारणांमुळे चारचाकी घेण्याचे स्वप्न अनेक जण लांबणीवर टाकत असतात. अशा वेळी आर्थिक मदतीला येतात, त्या बॅंका..!

बँकेकडून कर्ज घेऊन दारात चारचाकी उभी करण्याचे स्वप्न साकार करता येऊ शकते.. अनेक बॅंका कार लोनसाठी खास ऑफरही देत असतात. त्यातून नवीन कारच्या किमतीच्या 90 ते 100 टक्के फायनान्स मिळू शकतो. नवीन कार खरेदी करण्यासाठी कोणत्या बँका उत्तम व्याज दराने ‘लोन’ देतात, याबाबत जाणून घ्या…!

Advertisement

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
नवीन कार खरेदी करण्यासाठी बँक ऑफ बडोदामध्ये किमान 7 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. कार लोनवर अतिरिक्त प्रक्रिया शुल्क म्हणून बॅंकेकडून 1500 रुपये अधिक ‘जीएसटी’ आकारला जातो.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बॅंक कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय 7.20 टक्के व्याज दराने कार लोन देते. तथापि कर्जावरील प्रक्रिया शुल्क 31 जानेवारी 2022 पर्यंतच माफ करण्यात आले आहे.

Advertisement

कॅनरा बँक (Canara Bank)
कॅनरा बँकेकडून 7.30 टक्के व्याज दराने कार लोन मिळते. कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागते. त्याची किमान मर्यादा 1 हजार रुपये ते कमाल मर्यादा 5 हजार रुपये आहे.

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank)
अ‍ॅक्सिस बँक ही खासगी क्षेत्रातील बँक. मात्र, ही बॅंकही स्वस्त दरात कारसाठी लोन देते.. किमान 7.45 टक्के व्याज दराने कर्ज घेऊ शकता. त्यासाठी 3500 ते 7000 रुपये प्रक्रिया शुल्क आहे..

Advertisement

कार लोनसाठी निकष

  • कर्जासाठी अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 75 वर्षे असावे.
  • मासिक उत्पन्न किमान 20 हजार रुपये असावे.
  • सध्याच्या नियोक्त्याशी (एम्प्लॉयर) किमान 1 वर्ष संबंधित असावे.
  • कोणत्याही सरकारी कंपनीत किंवा खासगी कंपनीत पगारदार किंवा स्वयंरोजगार असावा.

तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा 

Advertisement