सध्याच्या घडीला अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी जोडी म्हणजे, अभिनेता भाऊ कदम नि कुशल बद्रिके.. मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या विनोदाने रसिक प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणारी दोन आघाडीची नावे.. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर ही जोडी सध्या रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे..
‘चला हवा येऊ द्या..’ या विनोदी शोमुळे खऱ्या अर्थाने ही जोडी महाराष्ट्रात हीट झाली. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपटही आले. त्यांनाही रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला..
एखाद्या कलाकृतीमुळे निर्माण होणारे वाद, महाराष्ट्रासाठी काही नवे नाहीत.. आक्षेपार्ह लिखाणामुळे, अभिनयामुळे यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका, नाटके.. इतकेच काय तर अनेक पुस्तकांवरही बंदी आली आहे. विनोदाच्या नावाखाली टिंगळ-टवाळी केल्याने अनेक कलाकारांना नेते, त्यांच्या कार्यकर्त्यांची माफी मागण्याची वेळ आली आहे..
काही कलाकारांविरुद्ध तर थेट पोलिसांत गुन्हेही दाखल झाले.. त्यांच्यावर अटकेची कारवाईही झाली.. अशाच एका प्रकाराला भाऊ कदम व कुशल बद्रिके या महाराष्ट्रातील दोन विनोदविरांना सामाेरे जावे लागले..
कुशल आणि भाऊ यांनी नुकतीच ‘पांडू’ या सिनेमात पोलिसांची भूमिका साकारली होती. या चित्रपटालाही महाराष्ट्रातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला.. मात्र, या चित्रपटामुळेच ही जोडी अडचणीत आली होती..
नेमकं काय झालं..?
‘चला हवा येऊ द्या..’च्या सेटवर हा प्रकार घडला असून, हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे या दोघांचे चाहते संभ्रमात पडले आहेत.
‘चला हवा येऊ द्या..’ या शोचे शुटींग सुरु असताना, अचानक तेथे पोलिसांची टीम येते.. भाऊ कदम व कुशल बद्रिके यांनी ‘पांडू’ चित्रपटात पोलिसांची टिंगल केल्याची तक्रार एका माजी पोलिस अधिकाऱ्याने केलीय. त्यानुसार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पोलिसांसोबत चलण्यास सांगण्यात येते..
दरम्यान, सेटवरुन या दोघांनाही बाहेर नेण्यात येते.. तेथे पोलिस अधिकारी व त्यांच्यात बराच वेळ चर्चा होते. थेट गुन्हा दाखल झाल्याने भाऊ कदम व कुशल बद्रिकेही चकीत होतात. सेटवरील सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकतो..
दरम्यान, हा सगळा प्रकार म्हणजे, ‘प्रॅंक’ असल्याचे सांगण्यात येते. डॉ. नीलेश साबळे यांनी सेटवरील पोलिसांची खरी ओळख सगळ्यांना करुन दिली. त्यानंतर भाऊ कदम व कुशल हे सुटकेचा नि:श्वास सोडतात. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..