SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पीएम किसान योजने’च्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर, आणखी एका योजनेचा लाभ घेता येणार..!

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. केंद्र सरकारने ‘पीएम किसान सन्मान योजने’चा (PM Kisan Yojana) दहावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेतून वर्षाला 6 हजार रुपयांची मदत मिळते. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे…

शेती व्यवसाय करताना, शेतकऱ्यांनी एका गोष्टीची सतत गरज पडते, ती म्हणजे, भांडवल..! खते-औषधे, बि-बियाणे, शेतीची मशागत करण्यासाठी भांडवल कमी पडते. ही बाब लक्षात घेऊन, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना हाती घेतली आहे.. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज उपलब्ध दिले जाणार आहे..

Advertisement

आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत मोदी सरकारने ‘पीएम किसान सन्मान योजना’ आणि ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ एकमेकांशी ‘लिंक’ केल्या आहेत. त्यामुळे ‘पीएम किसान सन्मान योजने’चा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता ‘किसान क्रेडिट कार्ड योजने’चाही लाभ घेता येणार आहे. त्यातून परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवता येणार आहे..

‘किसान क्रेडिट कार्ड’द्वारे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते. तसेच, अल्प मुदतीचे 3 ते 5 लाख रुपयांचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. या कर्जावर सरकार 2 टक्के सबसिडी देते. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास परत 3 टक्के सूट दिली जाते, परंतु कर्जफेडीला विलंब झाल्यास, या कर्जावर 7 टक्के व्याज दर आकारला जातो.

Advertisement

असे काढा ‘किसान क्रेडिट कार्ड’..?

  • किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पहिल्यांदा तहसील कार्यालयात जाऊन लेखापालांना भेटा.
  • लेखापालाकडून तुमच्या जमिनीचे कागदपत्रे काढून घ्या.
  • नंतर, कोणत्याही बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकांकडे ‘किसान क्रेडिट कार्ड’साठी मागणी करा.
  • ‘किसान क्रेडिट कार्ड’ ग्रामीण बँकेतून बनविल्यास सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळतो.
  • बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. यासह काही कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमचे ‘किसान क्रेडिट कार्ड’ तयार होईल.
  • केसीसी कार्डवर दिले जाणारे कर्ज तुमच्याकडे किती जमीन आहे, यावर अवलंबून आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement