SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’कडून धमाकेदार प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर, कमी किंमतीत 84 दिवस मिळणार विविध सुविधा..!

गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी दरवाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांच्या खिशाला रिचार्जसाठी आणखी मोठी झळ बसत आहे.. त्यात सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे जास्त प्रमाणात डेटाची गरज लागते..

जास्त इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग नि अधिक व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनला अनेकांची पसंती मिळत आहे.. तुम्हीही अशाच रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. ‘रिलायन्स जिओ’ने (Reliance Jio) अशा ग्राहकांसाठी 84 दिवसांसाठी शानदार प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

रोजचा 3GB डेटा
‘जिओ’ने 1,199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 3GB डेटा ऑफर केला आहे. त्यानुसार 84 दिवसांत एकूण 252 GB इंटरनेट डेटा ग्राहकांना मिळेल. शिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस फ्री आहेत.. सोबत ‘जिओ’चे सर्व ‘सबस्क्रिप्शन’देखील मोफत मिळणार आहेत..

719 रुपयांचा प्लॅन
‘जिओ’ने 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये हा आणखी एक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्यात ग्राहकांना रोज 2GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्यानुसार 84 दिवसांत एकूण 168 GB डेटा मिळणार आहे. शिवाय या ऑफरमध्ये ‘जिओ टू जिओ’ अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. रोज 100 मोफत ‘एसएमएस’ मिळणार असून, ‘जिओ’चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

Advertisement

666 रुपयांचा प्लॅन
‘जिओ’चा हाही प्रीपेड प्लॅन 84 दिवसांचा आहे. त्यात ग्राहकांना रोज 1.5GB डेटा मिळणार आहे. 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये रोज एकूण 126 GB पर्यंत डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ‘जिओ टू जिओ’ अनलिमिटेड काॅलिंग मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना रोज 100 मोफत ‘एसएमएस’ मिळणार आहेत..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement