SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुंतवणुकदारांना कमाईची संधी.., ‘एलआयसी आयपीओ’बाबत केंद्राचा ‘सेबी’ला अल्टीमेटम..!

गेल्या वर्षभरापासून एका ‘आयपीओ’ची जोरदार चर्चा आहे.. ते म्हणजे, भारतीय आयुर्विमा महामंडळ.. अर्थात ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’ची..! भारतातील हा सगळ्यात मोठा ‘आयपीओ’ असेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांचे लक्ष ‘एलआयसी आयपीओ’वर (LIC IPO) लागले आहे..

केंद्र सरकारला निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ खूप महत्त्वाचा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या निर्गुंतवणुकीतून 32,835 कोटी रुपये उभे करण्यात आले.

Advertisement

मोदी सरकारने मागच्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातच ‘एलआयसी’मधील अंशतः हिस्सा प्राथमिक बाजारात विक्री करण्याची घोषणा केली होती. ही प्रक्रिया चालू आर्थिक वर्षात पूर्ण केली जाणार आहे. आता आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास केवळ दोनच महिने शिल्लक असल्याने घडामोडींना वेग आला आहे..

केंद्राचा सेबीला सूचनावजा आदेश
गुंतवणुकदारांसाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते.. कारण, लवकरच ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.. त्यासाठी मोदी सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले असून, ‘एलआयसी आयपीओ’ला पुढील तीन आठवड्यात मंजुरी देण्याचा ‘अल्टीमेटम’ सरकारने ‘सेबी’ला दिला आहे.

Advertisement

सर्वसाधारणपणे ‘सेबी’कडून कोणत्याही ‘आयपीओ’ला मंजुरी देण्यासाठी 75 दिवस लागतात. मात्र, ‘एलआयसी’बाबत ही प्रक्रिया अवघ्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचा सूचनावजा आदेशच केंद्र सरकारने ‘सेबी’ला दिलाय. त्यासाठी माहिती पत्रकाची छाननी लवकर करण्याच्या सूचना सरकारने ‘सेबी’ला केल्या आहेत..

मार्चअखेर सुचिबद्ध होणार
‘एलआयसी’च्या मेगा ‘आयपीओ’साठी तब्बल 10 बँका काम करीत आहेत. समभाग विक्रीच्या माहिती पत्रकात काही शंका असल्यास, या 10 बँका 24 तास उपलब्ध असल्याची हमी सरकारने ‘सेबी’ला दिली आहे. त्यामुळे माहिती पत्रक आणि प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

Advertisement

एलआयसीचा ‘आयपीओ’ 31 मार्च 2022 पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठीचे माहिती पत्रक अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते बाजार नियामक ‘सेबी’कडे (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते…

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement