SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामात जास्त रस असेल. नोकरीबाबत निष्काळजी राहू नका. मोठ्या माणसांच्या भेटी होतील. कौतुक होईल.

वृषभ (Taurus) : अनपेक्षित फायदा होईल. मोठी आर्थिक तरतूद विचारपूर्वक करावी. तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होईल. जास्त विचार करू नका.

मिथुन (Gemini): कायदेशीर व्यवहार सांभाळा. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.

कर्क (Cancer) : नोकरीत पदोन्नती होईल. तुमचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होणार आहे. चर्चा करताना संयम बाळगावा. अधिकचा पैसा मालमत्तेत गुंतवा.

Advertisementसिंह (Leo) : तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटेल. इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. शैक्षणिक कामात तुमची आवड वाढेल.

कन्या (Virgo): आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय घेताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील. मनावर विपरीत परिणाम होऊ देऊ नका.

तूळ (Libra) : कामाचा अतिरिक्त ताण असेल. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. मार्केटिंग संबंधित कामांमुळे उर्जा संचारेल.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक स्थिती चांगली झाल्याने जागा किंवा वाहन खरेदी करण्याचा मनात विचार येईल. दिवस मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका.

Advertisementधनु (Sagittarius) : वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. तुमचा स्वभाव तुम्हाला खिन्न करेल आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. लोकांसोबत तुमची जवळीक वाढेल.

मकर (Capricorn) : मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. तरुणांना यश मिळेल.

कुंभ (Aquarius) : नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांचा तपास पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. दिवस मनासारखा घालवाल.

मीन (Pisces) : चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. दिवस चांगला जाईल. आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल.

Advertisement