SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: राज्यात 7 हजार 200 पदांसाठी पोलीस भरती होणार, पोलीस भरतीच्या तयारीला लागण्याआधी वाचा..

महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात (Police Recruitment) महत्त्वाची माहिती आली आहे. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्वतः अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माहीती दिली.

पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये 5 हजार 200 पोलिसांची भरती करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे. राज्यात 7 हजार 200 पदासाठी भरती (Recruitment for 7200 posts in Police department in maharashtra) प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

Advertisement

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 5 हजार 200 पदांसाठीची पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या ही भरती पूर्ण झाल्यानंतर 7 हजार 200 पदांसाठी भरती प्रक्रिया पुढील महिन्यात लगेच सुरू होणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आढावा बैठक घेतली. राज्यात मार्च महिन्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीसाठी कार्यक्रम हातात घेतला जाईल आणि पोलीस ठाण्यांचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे, त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement