SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क..? वारसा हक्क कायदा काय सांगतो, वाचा..!

संपत्तीवरुन होणारे वाद, भारतीय लोकांना काही नवे नाहीत.. मालमत्तेच्या वादातून जवळचे नातेवाईकही एकमेकांच्या जिवावर उठतात. प्रसंगी खून, मारामारी करायलाही मागे-पुढे पाहत नाही. बऱ्याचदा संपत्तीचा वाद कोर्टात पोहोचतो नि कित्येक पिढ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात बरबाद होतात. पैशांचा नि वेळेचाही अपव्यय होतो..

वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटप, म्हणजे अतिशय किचकट प्रक्रिया.. खरं तर बऱ्याच लोकांना संपत्तीबद्दल, त्याबद्दलच्या नियमांबद्दल फारशी माहिती नसते. अपूऱ्या माहितीमुळे अनेकांना हक्काच्या संपत्तीवरही पाणी सोडावे लागते.. काही जण हुशारी करुन दुसऱ्याच्या वाट्याची संपत्ती हडप करतात.

Advertisement

वडिलोपार्जित संपत्ती कोणाला मिळते, त्यासाठी काय नियम आहेत, आपला कायदा काय सांगतो, याबाबत पुरेशी माहिती असायला हवी.. यानिमित्ताने आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा हक्क असतो, याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊ या..

नातवास कधी संपत्ती मिळते..?
संपत्ती ही दोन प्रकारची असते… एक म्हणजे स्वत: कमावलेली, दुसरी म्हणजे, वडिलोपार्जित..! त्यापैकी कुठलीही संपत्ती नातवाला थेट मिळत नाही.. त्यासाठी काही नियम आहेत.. एक – वडिलांच्या मृत्यूनंतर, दोन- आजोबांनी नातवाच्या नावे मृत्यूपत्र केले असेल, तर ही संपत्ती नातवास मिळते.

Advertisement

स्वत: कमावलेल्या संपत्तीचेच मृत्यूपत्र आजोबा करु शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत आजोबा मृत्यूपत्र करु शकत नाहीत. आजोबांनी स्वत: कमावलेली संपत्ती असल्यास, ती थेट नातवाला मिळू शकत नाही. अशा संपत्तीवर नातू जबरदस्तीने आपला हक्क सांगू शकत नाही किंवा हिस्सा मागू शकत नाही.. ती संपत्ती कोणाला द्यायची, याचा अधिकार आजोबांना असतो..

हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 अंतर्गत वारस म्हणून, नातवाला दावा करण्याचा अधिकार नाही. आजोबा ही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात. आजोबा मृत्यूपत्र न करताच, मरण पावल्यास त्या संपत्तीवर फक्त त्यांची पत्नी, मुलगा नि मुलीच हक्क असतो. ती त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते. नि त्यावर अन्य कोणताही दावा करता येत नाही.

Advertisement

वडिलोपार्जित संपत्तीबाबत..
वडिलोपार्जित संपत्तीवर मात्र नातवाचा किंवा नातीचा पूर्णपणे हक्क असतो. नातवाच्या जन्माच्या वेळीच त्याच्या आजोबांच्या मालमत्तेमध्ये तो भागधारक बनतो. त्यात नातवाच्या/नातीच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या मृत्यूशी त्याचा काहीही संबंध नाही.

वडील, आजोबा किंवा पणजोबाकडून वारसा हक्काने मिळालेल्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा घेण्याचा अधिकार नातवास जन्माने मिळतो.. मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यूनंतर वारसा हक्कानुसार संपत्ती विभागून दिली जाते. असा हिस्सा देण्यास नकार दिल्यास, नातवाला दिवाणी खटला दाखल करता येतो. मालमत्तेच्या अधिकारापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा 

Advertisement