SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एसबीआय केसीसी’तून शेतकऱ्यांना मिळणार पैसा.., शेती व्यवसायासाठी भांडवलाची चिंता मिटली..!

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे, शेती.. काळ्या मातीत घाम गाळणारा शेतकरी सुखी-संपन्न व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक कृषी योजना सुरु केल्या आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात..

शेती व्यवसाय करायचा, तर भांडवल हवेच.. या भांडवलासाठी बऱ्याचदा शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवतात.. शेतकऱ्याची नड ओळखून खासगी सावकार त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करतात..

Advertisement

अशा सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी सरकारने खास योजना सुरु केली.. ती म्हणजे, ‘किसान क्रेडिट कार्ड’ अर्थात ‘केसीसी’ (KCC) योजना.. केंद्र सरकारने 1998 मध्ये ही योजना सुरू केली.. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे, हा योजनेचा उद्देश होता. ‘नाबार्ड’च्या माध्यमातून बँकांद्वारे ‘केसीसी’ कार्ड जारी केले जातात..

‘केसीसी’चा व्याजदर
‘केसीसी’ कार्डद्वारे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करुन दिले जाते. कोरोना संकटातही आतापर्यंत दोन कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’चे वाटप करण्यात आले आहे.. त्यात 2 ते 4 टक्के व्याजदर आकारला जातो. 4 टक्के व्याजाने शेतकऱ्यांना बॅंका 3 लाखांपर्यंत सहज कर्ज देतात..

Advertisement

‘केसीसी’साठी पात्रता..
किसान क्रेडिट कार्डसाठी 18 ते 75 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते. मात्र, 60 वर्षे वा त्याहून अधिक वयाच्या शेतकऱ्यांसाठी सहअर्जदार आवश्यक आहे.. पशुसंवर्धन व मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्यांना तीन लाख नव्हे, तर दोन लाखांपर्यंतच कर्ज मिळते..

‘एसबीआय केसीसी’बाबत..
‘एसबीआय’ बँकेकडून ‘केसीसी’ वाटप केले जाते. त्यासाठी सर्वप्रथम ‘एसबीआय योनो’ ॲप डाऊनलोड करा किंवा www.sbiyno.sbi वेबसाईटवर जावू शकता.

Advertisement
  • सर्वप्रथम ‘एसबीआय योनो’च्या अधिकृत वेबसाईटवर जा..
  • शेती पर्यायावरील ‘अकाउंट्स’ पर्याय निवडा. नंतर ‘किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यू’ विभागात जा..
  • ‘ॲप्लीकेशन’ पर्यायावर क्लिक करुन विचारलेली सगळी माहिती भरा. तुमचा अर्ज पूर्ण होईल.

शेतकऱ्यांची पडताळणी
कर्ज देण्यापूर्वी बँकांकडून अर्जदार शेतकऱ्यांची पडताळणी केली जाते.. शेतकऱ्याचा महसूल रेकॉर्ड तपासला जातो. ओळखीसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो घेतले जातात.. ‘केसीसी’ बनविण्यासाठी 2 ते 5 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ‘इंडियन बँक असोसिएशन’ने एक सल्लागार नेमून बँकांना शुल्कात सूट देण्यास सांगितले आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement