देशात शेती पध्दतीमध्ये नवनवीन बदल झाले की उत्पादनात वाढ होत जाते. पारंपारिक पीक पद्धतीत बदल घडवून राज्यातील असंख्य शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवतात. राज्यातील शेतकरी आधुनिक शेतीत पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील नसतात, असे अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीमचे उत्पादन शेतकऱ्याद्वारे घेतले जात आहे. सध्या (Silk Farming) रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम संचलनालयही विशेष प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच सध्या राज्यात 15 हजार 795 एकरामध्ये तुतीची शेती पसरली आहे. त्यापैकी 8 हजार 928 एकरवर तुती म्हणजे राज्यातील निम्म्याहून जास्त तुतीचे क्षेत्र हे फक्त मराठवाडा विभागात असल्याचं समजतंय.
रेशीम कोषाला मिळतोय विक्रमी दर
मराठवाड्यात 8 हजार 928 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण रेशीम उत्पादनात मराठवाड्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. रेशीम शेती हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात देखील वाढत आहे आणि रेशीम शेती पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायी सिद्ध होत आहे.
तुमच्या माहितीकरिता सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाला चांगला भाव मिळाल्याची माहीती आहे. रेशीम कोषाला 68 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर प्राप्त झाला आहे. सध्या देशात सर्वत्र रेशीम कापडाला विशेष मागणी आली आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना संचालनालयामार्फत मराठवाड्यातील जालना बीड यांसारख्या शहरात रेशीम कोषासाठी मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
एका एकरातून अडीच लाखाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता
जर तुमचं व्यवस्थापन योग्य असल्यास वर्षभरात 5 बॅचदेखील शक्य आहेत. शिवाय अंडीपुंज असल्यास 28 दिवसांमध्ये तर अळीच्या वाल्या अवस्थेत असल्यास 22 दिवसांमध्ये एक बॅच ही निघते. मग 45 ते 60 दिवसांमध्ये बॅच ही रिपीटही होते. नियोजनातून एकरी अडीच लाख रुपयांचा परतावा शक्य आहे. सध्या रेशीम कोषाचे दर हे 55 ते 900 रुपये किलोंवर आहेत. किंवा तुम्ही कोणी जाणकारांकडूनही माहिती मिळवू शकता. सोबतच कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतुनही माहीती मिळवू शकता.
राज्य सरकारचा ‘महारेशीम अभियान’ उपक्रम
रेशीम शेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारद्वारे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी एक आहे ‘महारेशीम अभियान.’ शेतकऱ्यांना याद्वारे रेशीम लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे.म्हणून रेशीम शेती भविष्यात शेतकऱ्यांना अर्थसमृद्ध बनविण्यासाठी मोलाचा वाटा उचलू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit