मागील काही वर्षांत देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एका अहवालानुसार, ऑगस्ट-2018 मध्ये देशात जवळपास 4.1 कोटी क्रेडिट कार्डचे युजर्स होते. त्यानंतर त्यात सातत्याने वाढच झाली आहे.
डिजिटल व्यवहाराच्या युगात क्रेडिट कार्ड महत्वाची बाब बनली आहे. देशात असे अनेक लोक आहेत, जे एकाच वेळी विविध बॅंकांचे क्रेडिट कार्ड वापरतात.. प्रामुख्याने दैनंदिन जीवनातील खरेदी, बिल भरणा व इतर व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो…
देशातील छोट्या शहरांमध्येही आता क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. मात्र, अनेकदा पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेताना गोंधळ उडतो. त्यातून अनेक चुका होतात. नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे, इथपासूनच गोंधळ असतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना काळजी घेणे आवश्यक असते..
सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या खर्चाची पद्धती व तुम्हाला कोणते फायदे मिळवायचे आहेत, हे ठरवून क्रेडिट कार्ड घ्या.. तुम्हाला फायदेशीर ठरतील, अशा काही क्रेडिट कार्डबाबत (‘5 एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्ड’) जाणून घेऊ या..
अमेझाॅन पे आयसीआयसीआय बँक
‘अमेझाॅन पे आयसीआयसीआय बँके’च्या क्रेडिट कार्डद्वारे प्राइम मेंबर्ससाठी 5 टक्के, तर नॉन-प्राइम मेंबर्ससाठी 3 टक्के, अमेझाॅनवर खरेदीसाठी अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. अमेझाॅनवर, या कार्डद्वारे रिचार्ज व बिल पेमेंट केल्यास 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. अमेझाॅन व्यतिरिक्त इतरत्र पेमेंट केल्यास 1 टक्का अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. हे लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आहे.
अॅक्सीस एसीई (Axis ACE)
अॅक्सीस एसीई क्रेडिट कार्डद्वारे गुगल पेवर रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक मिळते. शिवाय स्विगी, झोमॅटो, ओलावर 4 टक्के कॅशबॅक, तसेच इतर सर्व ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीवर 2 टक्के कॅशबॅक आहे. या कार्डसाठी वार्षिक 499 रुपये शुल्क आहे.
एसबीआय सिम्प्ली क्लिक (SBI SimplyCLICK)
एसबीआय सिम्प्ली क्लिक क्रेडिट कार्डवर अमेझाॅन, बूक माय शो, क्लिअरट्रीप, लेन्सकार्ट आणि नेटमेडसवर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च केल्यास 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. कार्डसाठी 499 रुपये फी आहे.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बॅंक (Flipkart Axis Bank)
फ्लिपकार्ट अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर फ्लिपकार्ट व मंत्रावर (Myntra)वरील खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. शिवाय क्लिअरट्रीप, पीव्हीआर, उबेर, स्विगी, क्युअर फिट, टाटा 1mg आणि टाटा स्कायवर 4 टक्के कॅशबॅक मिळते. इतर ऑनलाइन-ऑफलाइन खरेदीवर 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते. कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.
एचएसबीसी (HSBC)
एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे सर्व ऑनलाइन खर्चांवर ई-वॉलेट रिलोड वगळता, सर्व ऑनलाइन खर्चांवर 1.5 टक्के कॅशबॅक आणि इतर प्रकारच्या खर्चांवर 1 टक्के उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.