SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा! आता ग्रुपमधील मेसेजविषयी मिळणार ‘हा’ नवीन अधिकार..

फेसबुक पाठोपाठ व्हॉट्सअपनंही अनेकांच्या मनावर भूरळ घातली आहे. व्‍हाॅट्‍सॲप आपल्या युजर्ससाठी नेहमी वेगवेगळे बदल करत असते. WhatsApp च्या माध्यमातून एकाचवेळी अनेकांना मेसेज, व्हॉईस मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ फाईल्स, डॉक्यूमेंट्स पाठवले जाऊ शकतात, हे आपल्याला माहीतच असेल.

व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जवळपास 256 मेबर्सचा समावेश होऊ शकतो आणि ही मर्यादा फिक्स असते. एका रिपोर्टनुसार, ग्रुप सदस्यांपैकी कुणीही काही आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास ग्रुप Admin वर कारवाईची टांगती तलवार असते, तर आता या सर्व ग्रुप मेम्बर्सने ग्रूपमध्ये काही अनावश्यक मेसेज केले तर त्यांना तात्काळ काढून टाकण्याचा अधिकार आता ग्रुप ॲडमिनला मिळणार आहे.

Advertisement

व्हॉट्सॲप ग्रुप (Whatsapp group) मध्ये लोकांच्या भावना दुखावतील असे किंवा जात-धर्म किंवा इतर गोष्टींविषयी माहीती टाकून लोकांना भडकावणे, दंगल घडवणे यासारखे चुकीचे, अफवा पसरवणारे मेसेज प्रचंड व्हायरल होतात. त्यात एखाद्या ग्रुपमध्ये असा मेसेज आल्यास त्यावर Admin काहीच करु शकत नव्हता.

व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरमध्ये काय?

Advertisement

WaBetaInfo अहवालात असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये याआधी असे चुकीचे वा अफवा पसरवणारे मेसेज काढून टाकण्यासाठी वेळेची मर्यादा होती. पण यानंतर लवकरच हे मेसेज Whatsapp Group Admin ला डिलीट करण्याचा अधिकार मिळणार असल्याचं कळतंय. जर असं झालं तर व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला पॉवर मिळणार आहे आणि ग्रुप एडमिन व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमुळे ग्रुपमधील सदस्यांचे काही अनावश्यक मेसेज सर्वांसाठी डिलीट करु शकतो.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या वैशिष्ट्यांमधून संदेश डिलिट करण्याची वेळ मर्यादा काढून टाकण्याचा विचार व्हॉट्सॲप करत आहे. व्हॉट्सॲप युजर्सना मेसेज पाठवल्यानंतर तो हटवण्यासाठी वा डिलीट करण्यासाठी काही कालावधी असायचा. पण आता भविष्यात व्हॉट्सॲप कोणत्याही वेळी आणि कधीही पाठवलेला संदेश डिलिट करण्याची परवानगी ग्रुप ॲडमिनला देऊ शकते.

Advertisement

रिपोर्टनुसार, जर कुठल्याही मेसेजला ग्रुप एडमिननं डिलीट केले तर त्याखाली एक नोट डिस्प्ले असेल ज्यात हा मेसेज एडमिननं डिलीट केल्याची माहिती दिसेल. त्यामुळे ग्रुपमधील इतर यूजर्सना सहजपणे ग्रुप एडमिननं हा मेसेज डिलीट केल्याचं कळणार आहे आणि यामुळे काही चुकीचे मेसेज व्हायरल होण्याला नक्कीच आळा बसणार आहे. व्हॉट्सअप लवकरच हे फिचर जारी करणार असल्याची माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement