SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो ‘या’ कोबीची लागवड एकदा करून पाहाच..

जगात शेतीमुळेच भाजीपाला, फळ लागवड, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया लागवड, नगदी पिके व इतर गोष्टींमुळे लोकांना अन्न मिळते. अशा गोष्टी विविध प्रक्रियांतून जाऊन खूप कंपन्या त्यातून अमाप पैसा कमावतात, पण शेतकरी आजही कमी खर्चात जास्त उत्पादन कसं निघेल यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो आणि ते करायलाच हवेत.

कोणत्याही पीक लागवडीतून पैसा उभारता येतो फक्त शेतकऱ्यांनी पीक, वाण आणि योग्य व्यवस्थापन केलं तर केलेली शेती ही फलदायी ठरेल, यात शंकाच नाही. असेच एक शेतकऱ्याने एक प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळवलंय, जाणून घेऊयात त्यानी नेमकं काय व कसं केलं..?

Advertisement

बिहार राज्यातील चपरणा जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केली आहे. सगळ्या वाणामध्ये केशरी कोबीची जात उत्तम ठरलेली आहे. या वाणाच्या कोबीमध्ये पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असल्या कारणाने जास्त दर मिळतो.

मिळालेल्या माहितीनुसार, चपरणा जिल्ह्यातील शेतकरी परदेशी भाज्यांची लागवड करून आपल्याकडेही विविधता येऊ शकते, हे सिद्ध करत आहेत. तेथील या शेतकऱ्याने कॅनडामधील कोबीची लागवड करत आहेत. या शेतकऱ्याने केशरी कोबी ची लागवड करून 10 हजार रुपये खर्च केला आहे सर्व खर्च वजा करून त्यांना लाख रुपये फायदा झाल्याची माहीती आहे.

Advertisement

बिहारमधील समुता गावात राहणारे आनंद हे शेतकरी पहिल्यापासून आधुनिक शेती करत आहेत. आनंद यांनी यंदा आपल्या शेतीमध्ये संत्रा कोबी, बागणी कोबी आणि स्ट्रॉबेरीची लागवड केलीय. आनंद हे या सर्वांमधून आणि मत्स्यव्यवसायातून लाखो रुपये कमवतात. याशिवाय आनंद सिंग आपल्या शेतात केशरी कोबीची लागवड करत आहेत जो कोबी जगात विविध नावांनी ओळखला जात आहे. आनंद यांचे असे मत आहे की या कोबीच्या शेतीमधून सात ते आठ पटीने जास्त उत्पन्न निघते. तुम्ही हा कोबी बाजारभाव चांगला असेल, तर आपल्या मार्केटमध्ये किंवा इतर राज्यांत विकला किंवा मोठया शहरांत विकला तर दुप्पट फायदा कमवू शकता.

खर्च किती येणार अन् उत्पादन किती मिळणार..?

Advertisement

स्थानिक बाजारात जांभळ्या आणि केशरी कोबीचा दर 50 ते 60 रु. किलो रुपये आहे. आनंद सिंग यांनी म्हटलंय की, या कोबीची जर एक एकरमध्ये लागवड केली तर जास्तीत जास्त 10 ते 12 हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि त्यात निव्वळ नफा जवळपास लाख रुपये येऊ शकतो. तुमचं व्यवस्थापन योग्य असलं की फायदा तुमच्याच हातात आहे. आनंद सिंग यांनी त्यांच्या कोबी लागवडीची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा टाकली आहे. आनंद सिंग यांनी ऑनलाईनद्वारे बियाणे मागवून कोबीची लागवड केली आहे. ब्रिटन आणि फ्रान्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या कोबी ची लागवड केली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement