SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..? राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यात ओमायक्राॅनचे संकट आलेले आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा होणार का, कशा होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर उपस्थित होत आहेत…

अशातच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत मंत्री बच्चू कडू यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा मार्चऐवजी एप्रिल महिन्यात घेण्याची सूचना केली आहे.

Advertisement

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंदच होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यंदा ऑफलाईन पद्धतीनेच या परीक्षा होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे.. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणार असल्याचे दिसते..

लिखाणाचा सराव नाही..
मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास व लिखाणाचा सराव राहिलेला नाही. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव नसल्याने त्यांना दहावी-बारावीचे पेपर लिहिताना अडचणी येऊ शकतात. त्यात सध्या राज्यातील शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा घोळ सुरू असल्याने विद्यार्थीही संभ्रमात आहेत.

Advertisement

विद्यार्थ्यांना परीेक्षेची तयारी करता यावी, त्यांचा लिखाणाचा सराव व्हावा, यासाठी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याची सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केली आहे. त्यावर काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांचेही लक्ष लागले आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement