SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तळीरामांसाठी ‘गुड न्यूज’..! किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

तळीरामांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे.. दारुचे दुकान शोधण्यासाठी मद्यपींची होणारी ‘वणवण’ आता थांबणार आहे.. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता. 27) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे, आता राज्यातील सर्व किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये ‘वाईन’ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे..

राज्य मंत्रिमंडळाकडे आलेल्या प्रस्तावावर तब्बल 10 वर्षांनंतर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना, किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी सरकारने निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला..

Advertisement

शिवसेनेसह काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारने अखेर 10 वर्षांपासून रखडलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्यासाठी काही निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.

याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. “महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे सरकारने आता नवीन पॉलिसी ठरवली आहे. किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी सुपर माक्रेटची जागा 1 हजार स्क्वेवर फुट असायला हवी,” असे ते म्हणाले..

Advertisement

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालतात. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे मंत्री मलिक म्हणाले.

छोटे शॉपस् निर्माण करून त्यांना वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये एक स्टॉल, म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. गोवा आणि हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता असून, तेथे त्यांनी वाइन विक्रीचे हेच धोरण स्वीकारले आहे. मात्र, ते इथे विरोध करीत असल्याचा टोला मलिक यांनी लगावला..

Advertisement

राज्यात सध्या दरवर्षी 70 लाख लिटर वाईनची विक्री होते. सरकारच्या नव्या निर्णयामुळे हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारचाही महसूल वाढणार आहे.

अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जातो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बिअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

भाजपची सरकारवर जोरदार टीका
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. “शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ दारुलाच..! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे?”

सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय..! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही..”, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement