SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पाहावी लागेल. आवडते छंद जोपासावेत.

वृषभ (Taurus) : वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल.

मिथुन (Gemini) : आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. नकारात्मक विचार टाळावेत.

कर्क (Cancer): संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. सामाजिक बांधीलकी जपावी.सिंह (Leo) : काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका.

कन्या (Virgo): कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. मनात एक अनामिक भीती राहील. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

तूळ (Libra) : कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे.

वृश्चिक (Scorpio) : घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल.

Advertisementधनु (Sagittarius) : अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत.

मकर (Capricorn) : ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात.

कुंभ (Aquarius) : आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका.

मीन (Pisces) : योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस.

Advertisement