SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वाचा कोणाला डच्चू अन् कोणाला संधी?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी काल रात्री टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्माचे (Rohit sharma) दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे.

सध्याचा फॉर्म बघता वेगवान अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि गोलंदाज आर. अश्विनला सध्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे. फलंदाजी मजबूत झाली तरी गोलंदाजीमध्ये दीपक चहर, मोहम्मद सिराज, आवेश खान, शार्दुल ठाकूर यांसारखे गोलंदाज विस्कळीत गोलंदाजी मजबूत करू शकतात.

Advertisement

रोहित शर्माचं पुनरागमन…

काही दिवसांपासून दुखापतीतून सावरत असताना आता संघात कमबॅक केलेल्या रोहित शर्माकडे दोन्ही फॉरमॅट मधील संघांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. विराट कोहली दोन्ही मालिकांमध्ये खेळणार आहे. जसप्रीत बुमराहसोबत मोहम्मद शमीलाही या मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही. लेग स्पिनर रवि बिश्नोई, दीपक हुड्डाला पहिल्यांदाच संघात घेण्यात आली आहे.

Advertisement

टीम इंडिया: टी-20 आणि एकदिवसीय संघ:

टी-20 संघ (T-20 Team): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

Advertisement

एकदिवसीय संघ (ODI Team): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. यामध्ये 6 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीला असे 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. वनडे सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत, तर टी-20 सामने 16 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारीला होणार आहे.आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघाची कामगिरी सुधारणार का, याकडे नक्कीच लक्ष लागणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हेही वाचा : दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी 

पोस्ट खात्याची धमाकेदार योजना; कमी गुंतवणुकीत मिळणार 7 लाखापर्यंत बंपर रिटर्न..!

Advertisement

 

 

Advertisement