सारे जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा सामना करतेय. या आजारामुळे अनेक निर्बंध आले. कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स नि वारंवार हात धुणे, या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते..
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय.. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा विळखा हळुहळू सैल होत आहे. त्यामुळे तोंडाला लावण्यात येणाऱ्या मास्कपासून लवकरच नागरिकांची सुटका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत..
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कसंदर्भात चर्चा झाली. याबाबत लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्कबाबत धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने त्या दिवसाची वाट पाहत आहे..
अनेक देशांमध्ये अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण झाल्याने तिथली जनता मास्क (Mask) व अन्य कठोर निर्बंधातून मुक्त झाली आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायलमध्ये अत्यंत वेगात लसीकरण करुन जनतेला मास्कमुक्त करण्यात आले होते.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाच्या डेल्टा विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढू लागल्याने तेथे पुन्हा एकदा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. जगातील ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली, तसेच सौदी अरेबियामध्येही लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झालेल्या देशांनी लोकांची मास्कमधून सुटका केली आहे. अमेरिकेने तर 37 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणानंतरच मास्क न घालण्याची परवानगी दिली होती.
राज्याची मास्कमधून सुटका?
महाराष्ट्रात आतापर्यंत 14 कोटी 69 लाख 57 हजार नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 कोटी 3 लाख 12 हजार 240 नागरिकांनी दुसरा, तर 8 कोटी 59 लाख 17 हजार 37 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर राज्यातील नागरिकांचीही मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे..
मास्कसंदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्कबाबत धोरण जाहीर केले जाणार असल्याचे आजच्या मंत्रीमंडळच्या बैठकीत ठरले. त्यामुळे लवकरच राज्यातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार असल्याचे बोलले जात आहे..
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा