ब्रेकिंग : युट्युबर ‘खान सर’ यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल, वाचा काय आहे बिहार रेल्वे भरती घोटाळा प्रकरण..?
बिहार राज्यात रेल्वे भरतीच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत अनेक विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्राप्त माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (NTPC) नोकरभरतीसाठी सीबीटी-2 परीक्षाचे निकाल 14 व 15 जानेवारी 2022 ला जारी केले.
रेल्वे भरतीच्या या निकालानुसार सीबीटी-2 म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. पण या संपूर्ण प्रक्रियेत आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
..आणि मग सुरू झाले आंदोलन!
रेल्वे भरतीत घोटाळा झाल्याचे वृत्त हळूहळू पसरायला लागले आणि तोच या मुद्द्यावरुन बिहारमधील काही जिल्ह्यांत आंदोलन करायला सुरुवात झाली आणि रेल्वे भरती बोर्डाविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरत आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली.
दरम्यान बुधवारी बिहारच्या गया जिल्ह्यामधील याच आंदोलनाच्या दरम्यान एका रेल्वेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आग लावल्याचे आपल्याला दिसले असेलच. तसे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना रिकामी ट्रेन पेटवली आहे. तसेच दगडफेक आणि जाळपोळ विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्याचसोबतच रेल्वे प्रशासनाबाबत घोषणा देखील करण्यात आल्या आहेत.
‘रेल्वे भरती प्रकरणी खान सरांचा एक व्हायरल व्हिडिओ बघून आपण जाळपोळ केली’, असं काही विद्यार्थ्यांनी वक्तव्य केलं आहे. आता अशा आरोपांनी हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल, सांगता येत नाही. राजेंद्र नगर टर्मिनलवर मंगळवारी घातलेल्या गोंधळामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या किशन कुमार, विक्रम कुमार आणि रोहित कुमार या विद्यार्थ्यांच्या वक्तव्यानुसार किंवा खुलासानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.
‘खान सर’ नेमकं आहेत तरी कोण?
विद्यार्थ्यांनी मान्य केलेल्या त्या गोष्टीवरून खान सर दोषी असल्याचं जरी ऐकू येत असेल, पण नक्की खान सर दोषी आहेत काय किंवा त्यांचे व्हिडीओ हिंसा होण्याइतपत आहेत काय, हे समजणे गरजेचे आहे. पटना जिल्हा प्रशासनाने कोचिंग क्लासचे शिक्षक खान सर आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
आता हे खान तुमच्यापैकी अनेक जणांना माहीत असतीलच. ते शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. ते आपल्या चॅनलद्वारे मनोरंजक गोष्टी सांगतात, स्पर्धा परिक्षा आणि सामान्य ज्ञानविषयी माहीती देतात आणि ते शैक्षणिक व्हिडिओही बनवतात. यूट्यूबवर त्याचं Khan GS Research Centre (खान जीएस रिसर्च सेंटर) नामक प्रसिद्ध एज्युकेशनल चॅनेल आहे ज्याचे सध्या 14.5 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
खान सर पटनामधील प्रसिद्ध शिक्षक आहेत. ते आपल्या चॅनेलमधून सामान्य ज्ञानविषयी देशातील-जगातील अनेक कुतुहलाच्या गोष्टी व्हिडिओद्वारे सादर करत असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत, उदाहरण देऊन विषय सोपा करुन सांगण्याची कला आणि त्यांच्या बोलण्याची शैलीमुळे त्यांचे फॅन्स यामुळे ते सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. पण सध्या ते या वेगळ्याच विषयामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हेही वाचा : दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी
पोस्ट खात्याची धमाकेदार योजना; कमी गुंतवणुकीत मिळणार 7 लाखापर्यंत बंपर रिटर्न..!
वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा!