आयुष्याच्या उतार वयात गाठीशी दोन पैसे असणे गरजेचे असते.. आजारपण, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हे पैसे कामी येतात. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते. त्याचा ज्येष्ठांना मोठा फायदा होत असल्याचे पाहायला मिळते..
म्हातारपणात पैशांची चणचण भासू नये, यासाठी सुरुवातीपासूनच तजवीज करायला हवी.. त्यासाठी विविध याेजनांमध्ये गुंतवणूक करता येते.. पोस्ट खात्यामार्फत वृद्धांसाठी अशी योजना राबवण्यात येते. त्यात गुंतवणूक केल्यास बँकेच्या ‘एफडी’पेक्षा जास्त व्याज मिळते. शिवाय ही गुंतवणूक सुरक्षितही असते..
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS).. असे या योजनेचे नाव आहे.. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही सर्वात चांगली योजना आहे. या योजेनबाबत कसा फायदा होतो, याबाबत जाणून घेऊ या…
योजना कोणासाठी..?
– ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडण्यासाठी वय 60 वर्षे असावे, मात्र स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तेही योजनेत खाते उघडू शकतात.
– या खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात. सेवानिवृत्ती लाभांच्या रकमेपेक्षा ही रक्कम जास्त नसावी. 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा करता येतात.
– योजनेत 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. मॅच्युरिटीनंतर ही योजना 3 वर्षांसाठी वाढवता येते.
– सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना सुरु आहे. योजनेच्या खात्यातून मिळणारे व्याज त्याच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदाराच्या लिंक केलेल्या बचत खात्यात आपोआप जमा होते.
– खातेदार एक किंवा जास्त लोकांना ‘नॉमिनी’ करू शकतो. योजनेतून मध्येच पैसे काढायचे झाल्यास, एक वर्षानंतर काढता येतात, मात्र त्यासाठी दंड भरावा लागतो.
7 लाख कसे मिळणार..?
एखाद्याने दरमहा 8,334 रुपये जमा केल्यास 5 वर्षांनंतर सुमारे 7 लाख रुपये मिळतात. दरमहा 8,334 रुपयांनुसार वर्षभरात एक लाख रुपये जमा होतील, म्हणजेच 5 वर्षात 5 लाख रुपये जमा होतात. व्याजासह ही रक्कम 6,85,000 रुपये मिळते.
कर कपातीचा लाभ
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कपातीचा लाभ मिळतो. योजनेतील व्याज पूर्णपणे करपात्र आहे. आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर ‘टॅक्स डिडक्शन’ (TDS) लागू होतो. 2020-21 पासून टीडीएस कपातीची मर्यादा लागू केलेली आहे.