SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! आता तुमची ट्रेन चुकणार नाही, भारतीय रेल्वेचा नवा नियम जाणून घ्या…

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची विविध कारणांनी काही वेळा निश्चित स्थानकातून ट्रेन चुकते. मग आपण मुख्य रेल्वे स्थानकाऐवजी इतर दुसऱ्या स्थानकावरून रेल्वेमध्ये चढतो, जेणेकरून ट्रेन चुकू नये. पण लक्षात ठेवा की, ट्रेन चुकू नये यासाठी केलेली धडपड योग्य तेव्हाच ठरेल जेव्हा बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी आपल्याला आपल्या तिकिटात बदल केला जाईल, अन्यथा आपल्याला दंड भरावा लागू शकतो.

आता बुक केलेल्या तिकिटामधेच बदला बोर्डिंग स्टेशन:

Advertisement

रेल्वेने प्रवास करत असाल, तर आपल्याला अनेकदा अचानकपणे बोर्डिंग स्टेशन बदलण्याचीही गरज भासते. जसे, बोर्डिंग स्टेशनपासून प्रवासी दूर असल्यास अनेकवेळा ट्रेन चुकण्याची चिंता असते. समजा जर ट्रेन, प्रवाशाजवळील स्टेशनवर थांबत असेल तर प्रवासी आपले बोर्डिंग स्टेशन रिव्हाइज करू शकतात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आवश्यक बाब असल्याचं लक्षात घेऊन IRCTC बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देते. ही सुविधा, ज्या प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने रेल्वेचे तिकिट बुक केले आहे, अशा सर्व प्रवाशांसाठी आहे. मात्र, ट्रॅव्हल एजंटकडून आणि पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टममार्फत ज्यां प्रवाशांनी तिकीट बुक केले, अशांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तर सोबतच VIKALP ऑप्शनच्या PNRs मध्येही बोर्डिंग स्टेशनमध्ये बदलही करता येणार नाही.

Advertisement

ट्रेन सुटण्याच्या किती तास आधी करावा लागणार बदल?
ज्या प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलायचं असेल, त्यांना ट्रेन सुटण्याच्या 24 तासांपूर्वी ऑनलाईन बदलता येणार आहे, पण IRCTC च्या अधिकृत वेबसाईटनुसार, प्रवाशाने एकदा आपले बोर्डिंग स्टेशन बदलले, तर त्याला ओरिजनल (मूळ) बोर्डिंग स्टेशनपासून ट्रेनमध्ये बसता येणार नाही.

रेल्वेने प्रवास करायचा असेल तर बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल न करता दुसर्‍या स्टेशनवरून ट्रेन पकडली, तर त्याला दंड भरावा लागेल. तसेच त्याच्याकडून बोर्डिंग पॉइंट ते सुधारित बोर्डिंग पॉइंटमधील भाडेही वसूल केले जाणार आहे. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे, IRCTC च्या नियमांनुसार बोर्डिंग स्टेशनमध्ये फक्त एकदाच बदल केला जाऊ शकतो.

Advertisement

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सोपी पद्धत:

1. सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाईट https://www.irctc.co.in/nget/train-search वर जा.
2. लॉग-इन आणि पासवर्ड भरा व त्यानंतर ‘Booking Ticket History’ मध्ये जा.
3. आपली ट्रेन सिलेक्ट करा आणि ‘change boarding point’ वर जा.
4. एक नवे पेज ओपन झाले की, ड्रॉप डाऊनमध्ये त्या ट्रेनसाठी नवे बोर्डिंग स्टेशन निवडा.
5. नवे स्टेशन निवडल्यावर सिस्टिम कन्फर्मेशन मागेल. आता आपण ‘OK’ बटनावर क्लिक करा.
6. बोर्डिंग स्टेशन बदलण्यासंदर्भातील एक एसएमएस (SMS) तुमच्या मोबाइलवर येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

हेही वाचा : पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ महिन्यात येणार 11वा हप्ता 

 

Advertisement

 

Advertisement