SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वदेशी कंपनीचा स्मार्टफोन भारतात लॉंच, ‘हे’ आहेत धडाकेबाज फीचर्स..

मायक्रोमॅक्सने आपला नवा स्मार्टफोन Micromax IN Note 2 भारतात लाँच केला आहे. स्वदेशी स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने ‘Micromax In Note 2’ हा नवीन स्मार्टफोन देशात लाँच केला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,490 रुपये आहे.

ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर फोन ऑफरमध्ये 12,490 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे. फोनची विक्री 30 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. फोन AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G95 आणि 5000mAh बॅटरी सपोर्टसह लॉंच केला गेला आहे.

Advertisement

Micromax In Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा स्क्रीन रिफ्रेश रेट 60Hz (refresh rate) आहे. फोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G95 समर्थित आहे. फोन Android 11 वर कार्य करतो. या स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सर व सिंगल स्पीकर दिला आहे.

Micromax In Note 2 स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 16MP front camera आहे. Micromax In Note 2 स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला क्वाड रियर कॅमेरा सेटअप (Quad rear camera setup) देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48MP आहे. याशिवाय 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स (Ultra wide angle lens), 2MP डेप्थ आणि मॅक्रो लेन्स (macro lens) आहेत. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast charging support) देण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, हा स्मार्टफोन ऐन प्रजासत्ताक दिनाच्या अवतीभोवती लॉंच झाल्याने एक स्वदेशी कंपनी म्हणून या स्मार्टफोनची विक्री जोरदार होऊ शकते. त्यासोबतच चीनी कंपन्यांनाही भारतीय कंपनी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असणार आहे, असं दिसतं.

देशात सध्या चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी स्मार्टफोन्स विक्रीत बहुतांश हिस्सेदारी मार्केटमध्ये काबीज केली आहे. तसेच यानंतर दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगलाही आपल्या देशात जबरदस्त प्रतिसाद मिळतो. या विदेशी कंपन्या आहेत. आता काही भारतीय कंपन्यांनी नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. त्यात मायक्रोमॅक्सच्या या नव्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनची विक्री 30 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे समजत आहे. देशातील लोक या फोनला किती प्रतिसाद देतात, हा फोन खरेच चीनी कंपन्यांना टक्कर देणार का, यावरून कंपनीचे विक्री करण्यामध्ये भवितव्य ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement