SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वेतील नोकरी कशी मिळवायची..? पदानुसार पात्रता, निवड प्रक्रिया नि पगार किती..?

प्रत्येक तरुणाचे एक स्वप्न असतं.. ते म्हणजे, सरकारी नोकरी.. त्यातही रेल्वेतील नोकऱ्यांना अनेकांचे प्राधान्य असते. विशेष म्हणजे, अगदी दहावी पास ते पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही रेल्वेत नोकरी मिळते.. त्यामुळेच रेल्वेतील नोकरीसाठी दरवर्षी हजारो तरुण अर्ज करीत असतात.. त्यातून काहींचे स्वप्न साकार होते.. तर काहींना वाट पाहावी लागते..

रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी नेमकं काय करायला लागते, त्यासाठी कोणती परीक्षा असते, उमेदवारांची निवड कशी होते, वेतन कसे व किती मिळते, असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर असतील.. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Advertisement

रेल्वेतील नोकरीच्या श्रेणी
उमेदवाराच्या पात्रतेनुसार रेल्वेत नोकरी मिळवता येते. त्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ गटाअंतर्गत नोकऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. पैकी गट ‘अ’ व ‘ब’ ही अधिकाऱ्यांसाठीची श्रेणी आहे.

गट ‘अ’साठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) माध्यमातून रेल्वेतील गट ‘अ’साठी भरती केली जाते. त्यासाठी नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा किंवा एकत्रित वैद्यकीय परीक्षा द्यावी लागते. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डामार्फत (Railway Recruitment Board) ही भरती होत नाही. गट ‘अ’साठी अर्ज करण्यासाठी अभियांत्रिकी, एमबीबीएस किंवा एमएससी पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Advertisement

गट ‘ब’साठी निवड
रेल्वेतील गट ‘ब’मधील पदांसाठी वेगळी भरती केली जात नाही. गट ‘क’मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनाच गट ‘ब’मध्ये बढती दिली जाते. गट ‘ब’साठी वेगळी भरती केला जात नाही..

गट ‘क’साठी भरती
गट ‘क’मध्ये स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लोको पायलट, गार्ड, ट्रॅफिक अप्रेंटिस अशा पदांचा समावेश होतो. गट ‘ड’मधील नोकरी अराजपत्रित अधीनस्थ पदांतर्गत येतात. रेल्वे भरती बोर्डाद्वारे ही भरती केली जाते. त्यासाठी अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. या पदांसाठी उमेदवार बारावी किंवा पदवी उत्तीर्ण झालेला असावा.

Advertisement

गट ‘ड’साठी भरती
गट ‘ड’मध्ये हेल्पर, हॉस्पिटल अटेंडंट, गेटमन पोर्टर, ट्रॅकर, पॉइंट मॅन आदी पदांचा समावेश होतो. ही भरतीही रल्वे भरती बोर्डाद्वारे केली जाते. त्यासाठी उमेदवार दहावी किंवा आयटीआय (ITI) उत्तीर्ण झालेला असावा.

निवड प्रक्रिया व पगार..
गट ‘क’ आणि ‘ड’मधील नोकरीसाठी संगणक प्रणालीवर परीक्षा होते. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. बहुतांश प्रश्न हे रिझनिंग, मॅथ्स, जनरल नॉलेज व इंग्रजी विषयाशी संबंधित असतात. रेल्वेतील नोकऱ्या शिक्षणाच्या आधारे मिळतात. पदानुसार पगार मिळतो. प्रत्येक रँकनुसार पगार निश्चित केलेला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement