SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका.

वृषभ (Taurus) : जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

मिथुन (Gemini) : सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. मानसिक अवस्था संतुलित ठेवा.

Advertisementकर्क (Cancer): आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील.

सिंह (Leo) : विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका.

कन्या (Virgo): आजचा दिवस संमिश्र आहे. आज कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची गरज आहे. तब्बेत चांगली राहील.तूळ (Libra) : मन प्रसन्न असेल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल.

धनु (Sagittarius) : आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी दुरुनच संबंध ठेवा नाहीतर मतभेद होतील.

Advertisementमकर (Capricorn) : घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील.

कुंभ (Aquarius) : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल.

मीन (Pisces) : बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल.

Advertisement