SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ महिन्यात येणार 11 वा हप्ता.. ‘पीएम किसान’ योजनेसाठी अशी करा नोंदणी..

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मोदी सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यात वर्ग करीत असते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दहावा हप्ता वर्ग केला होता.

दरम्यान, देशभरात असे अनेक शेतकरी आहेत, जे पात्र असतानाही त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. मोदी सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 11वा  हप्ता वर्ग केला जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नसल्यास, तातडीने या योजनेत नोंदणी करणे गरजेचे आहे..

Advertisement

पुढील हप्ता कधी मिळणार..?
मोदी सरकारकडून प्रत्येक आर्थिक वर्षानुसार तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये वर्ग केले जातात. हा हप्ता कधी मिळणार, याचेही नियोजन सरकारने केले आहे. ते पुढीलप्रमाणे –

  • पहिला हप्ता –  1 एप्रिल ते 31 जुलै
  • दुसरा हप्ता – 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर
  • तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च

वरीलप्रमाणे मोदी सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर दर हप्त्याला 2 हजार रुपये वर्ग केले जातात. पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता 11 वा हप्ता एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता आहे..

Advertisement

दरम्यानच्या काळात ज्या शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच आधी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही आता ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे, अन्यथा 11 वा हप्ता मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे..

योजनेसाठी पात्रता
– ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर, म्हणजेच 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे, त्यांनाच आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता. मात्र, आता सरकारने जमिनीची मर्यादा रद्द केली आहे.
– इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. उदा. वकील, डॉक्टर, सीए आदी.

Advertisement

नोंदणी कशी करणार..?
– सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– नंतर ‘फार्मर्स काॅर्नर’ (Farmers Corner)वर क्लिक करा
– तुम्हाला ‘New Farmer Registration’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– नंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
– सोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा. नंतर ही प्रक्रिया पुढे सुरु ठेवा.
– फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
– सोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीसंबंधित माहिती भरावी लागेल.
– नंतर फॉर्म सबमिट करा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement