सध्याच्या काळात पैसे बचत करण्यामागे लोक गुंतवणूकही करत आहेत. बदलत्या वेळेनुसार म्हणा किंवा वाढत्या महागाईमुळे म्हणा पण पैसे टिकविणे मुश्किल न व्हावं म्हणून गुंतवणूक करणं काही अंशी जोखमेचं जरी असलं तरी सोयीचं व फायदेशीर ठरतं.
आता तुम्ही म्हणाल ती नेमकं कशी करावी आणी हमखास परतावा मिळेल का? तर गुंतवणूक म्हटलं की जोखीम आलीच पण आपण FD (fixed deposit) ला प्राधान्य देतो. कारण एफडी केली तर जोखीम ही क्वचितच असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहोत की गूगल पे ॲपवर एफडी खाते उघडून (FD Account On Google Pay) ऑनलाईन एफडी कशी करू शकता. तुम्हाला यूपीआय पेमेंट सिस्टम गुगल पे ॲपवर (Gpay) एफडी करता येणार आहे.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर UPI संबंधित पेमेंट करण्यासाठी phonepe, Google pay सारखे ॲप हवे असतात. तुमच्या बँक अकाऊंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक हवा. आता मग तुम्हाला जर एफडी खाते (FD Account) उघडायचं असेल आणि तुम्ही Google Pay खाते उघडलेले असेल तर तुम्ही हे काम काही मिनिटांतच करू शकता.
गुगल पे ने अलीकडेच एक नवीन फिचर लाँच केले आहे ज्याद्वारे तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला Google Pay ॲपवरून FD करण्याची सुविधा देण्यासाठी ‘Equitas Small Finance Bank’ सोबत करार केला आहे. याद्वारे तुम्ही बँक एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फीचर सध्यातरी अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
एफडी खाते उघडण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
▪️ Google Pay ॲपमध्ये FD खाते उघडण्यासाठी, तुमच्या फोनवर Google Pay ॲप उघडा.
▪️ खाली स्क्रोल करत आल्यानंतर व्यवसाय आणि बिल पर्याय आणि फायनान्स पर्याय ओपन करा. (किंवा Equitas Small Finance Bank असं सर्च करा)
▪️ Equitas Small Finance Bank लोगो निवडा आणि त्यावर क्लिक करा.
▪️ ‘Equitas Small Finance Bank by Setu’ नावाची नवीन विंडो दिसेल.
▪️ मग Get Started पर्यायावर क्लिक करा. येथे Open FD in 2 minutes असे लिहिले जाईल.
▪️ ‘Invest Now’ पर्यायावर क्लिक करा. ‘Invest Now’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला FD चे सर्व पर्याय दाखवेल.
▪️ येथे तुम्ही Create FD वर क्लिक करा. पुढे, मुदत ठेव रक्कम आणि व्याज दराची पुष्टी करा. त्यानंतर केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करा.
▪️ यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पिन कोड भरावा लागेल. शेवटी सबमिट करा. अशा प्रकारे तुमचे मुदत ठेव खाते उघडले जाईल.
व्याज किती मिळणार…?
आता सध्या, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सुमारे 6.35 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतेय. फायद्याचं म्हणजे तुम्हाला FD साठी Equitas बँकेत खाते उघडण्याची गरज नाही, त्यामुळे बँकेत चक्कर मारण्याचे कष्ट संपणार आहे. कारण हे खाते UPI ID द्वारे मॅनेज केले जाईल. तुमच्या ठेवींचा मागोवा, नवीन ठेव जोडणे, मुदतीपूर्वी पैसे काढणे असं काही काम तुम्ही घरबसल्या गूगल पे ॲपवरून ऑनलाईन करु शकता.
(नोंद घ्या: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहेत, एफडी व्याजदरात भविष्यात होणारा बदल किंवा जोखीम हा बँकेच्या नियमांवर आधारित असेल.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हेही वाचा : 1️⃣ आता सात-बारा उतारे बंद होणार..! भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय..
2️⃣ तुमचा मोबाईल चोरीला गेलाय किंवा हरवलाय? मग मोबाईल ऑनलाईन ब्लॉक कसा करायचा..?
3️⃣ ॲमेझॉन कंपनीकडून भारतीय तिरंग्याचा अपमान! सोशल मीडियावर रंगतेय चर्चा..