SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमचा मोबाईल चोरीला गेलाय किंवा हरवलाय? मग मोबाईल ऑनलाईन ब्लॉक कसा करायचा, जाणून घ्या..

तुमच्याकडे हजारो रुपयांचा स्मार्टफोन असेल आणि तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला तर त्यात फोटो, व्हिडीओ आणि बँकिंग डिटेल्सचा गैरवापर होण्याची भीती जास्तच असते. या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे सरकारने अलीकडेच सुरू केलेले CEIR Portal (सीईआयआर पोर्टल) आहे.

सीईआयआर पोर्टलच्या मदतीने तुम्ही चोरी गेलेला किंवा तुमचा हरवलेला स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन ब्लॉक करू शकता. स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेल्यास, काही वेळाने तुमचा स्मार्टफोन सापडला तर तो ब्लॉक झाला असेल. त्यामुळे ब्लॉक केलेला स्मार्टफोन केवळ CEIR पोर्टलच्या मदतीने ब्लॉक आणि अनब्लॉकही करता येऊ शकेल व स्मार्टफोनचा वापर आधीप्रमाणे करता येईल.

Advertisement

स्मार्टफोन चोरीला गेला तर…

समजा, तुमचा स्मार्टफोन चोरीला गेलाय तर सर्वात आधी पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही एफआयआर (FIR) दाखल करा आणि त्यामुळे तयार झालेला एक एफआयआर क्रमांक जो भविष्यात स्मार्टफोनचा गैरवापर झाल्यास कायदेशीर मदत करेल, म्हणून हे महत्वाचे ठरेल.

Advertisement

स्मार्टफोन चोरीला गेल्यास ब्लॉक कसा करायचा?

▪️सर्वात आधी तुम्ही CEIR च्या वेबसाईटला भेट द्या 👉 https://www.ceir.gov.in/Home/index.jsp
▪️ मग तेथे Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile असे पर्याय दिसतील.
▪️ चोरी झालेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी Block/Lost Mobile अशा पर्यायावर क्लिक करा.
▪️ मग एक पेज ओपन होईल, ज्यात मोबाईल डिटेल्स भरा.
▪️ मोबाईल डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर, IMEI नंबर, स्मार्टफोन कंपनी आणि मॉडेल, स्मार्टफोन खरेदी करतेवेळी बिलाची तारीख, फोन नंबर (phone number), फोन कुठे चोरीला गेला ते ठिकाण व इतर माहीती टाकावी लागेल.
▪️ तसेच पोलिस तक्रारीची प्रत अपलोड करावी लागेल.
त्यानंतर Add more तक्रारवर क्लिक करा, ज्यामध्ये मोबाईल मालकाचे नाव, पत्ता, पॅन कार्ड सोबत आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळख अशी माहीती भरावी लागेल.
▪️ इतर सर्व माहीती भरल्यानंतर Get OTP वर क्लिक करा आणि मग तुमच्या नंबरवर एक OTP (ओटीपी) क्रमांक येईल. मग पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली समजा. आता शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून मोबाईल फोन तुम्ही ब्लॉक करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

हेही वाचा : आता सात-बारा उतारे बंद होणार; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय..