SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ॲमेझॉन कंपनीकडून भारतीय तिरंग्याचा अपमान, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा, प्रकरण काय?

जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी म्हणजेच ॲमेझॉन (Amazon) कंपनी मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. ऐन भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲमेझॉनवर विविध वस्तूंचा नेहमीप्रमाणे यावर्षीही सेल सुरू आहे. पण यावेळी अचानकच ट्विटरवर #Amazon_Insults_National_Flag असा एक हॅशटॅह ट्रेंड होत असल्याचं दिसतंय.

जाणून घ्या, नेमकं प्रकरण काय..?

Advertisement

ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवरील चॉकलेट, बॅग्स, टी-शर्ट्सवर भारताचा राष्ट्रध्वज छापण्यात आल्याचं समजतंय. काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा भारतीय ध्वजाचा अपमान असल्याने ॲमेझॉनवर कारवाईची मागणीही होत आहे.

उद्या (दि. 26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त लोक देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. परंतु काही लोक वस्तू विकण्यासाठी मात्र भारतीय तिरंग्याचा अपमान होईल अशा पद्धतीचा अवलंब करतात, असं मत काही ट्विटर यूजर्सने व्यक्त करत फोटो देखील पोस्ट केले.

Advertisement

ॲमेझॉनच्या वेबसाईटवर कपडे, कप, चाव्यांचा गुच्छ आणि जॉकलेट सारख्या वस्तूंवर तिरंग्याचा फोटो लावण्यात आले आहे. या वस्तूंवरील छापलेला तिरंग्याचा फोटो काढून टाकण्याची मागणी करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी कडक कारवाई करण्याची मागणी नेटिझन्सकडून करण्यात येत आहे.

कायदेशीर कारवाई होणार..?

Advertisement

एका ट्विटर यूजरने लिहिले की, तिरंगा ध्वज असलेला टी-शर्ट ई-कॉमर्स साइट ॲमेझॉनवर विकला जात आहे. याआधीही अनेकवेळा शूज आणि टॉयलेट सीट कव्हर, मास्क इत्यादी विकून ॲमेझॉनकडून भारताच्या तिरंग्याचा अपमान केला जात आहे. तसेच, आणखी एका यूजरने म्हटलं की, भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी सर्व उत्पादने त्यांनी परत घ्यावीत. हे खूप लाजिरवाणे आहे.
सरकारने यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सोशल मीडियावर अनेक युझर्सनी ॲमेझॉनवरील वस्तूंचे फोटो शेअर करत हा राष्ट्रध्वाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणावर ॲमेझॉनने प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, “आमच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येण्याआधी त्यासंदर्भातील सर्व नियम पाळणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. नियम न पाळणाऱ्या काही विक्रेत्यांवर आम्ही नक्कीच योग्य ती कारवाई करणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हेही वाचा : आता सात-बारा उतारे बंद होणार..! भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय..

तुमचा मोबाईल चोरीला गेलाय किंवा हरवलाय? मग मोबाईल ऑनलाईन ब्लॉक कसा करायचा..?

 

Advertisement