गोरगरीब घरातील महिलांची चूलीच्या धुरापासून सुटका व्हावी, या उद्देशाने मोदी सरकारने या महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एक योजना सुरु करण्यात आली. ही योजना म्हणजे, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना..’
मोदी सरकारने 1 मे 2016 रोजी ‘उज्ज्वला’ गॅस योजना सुरु केली. सुरुवातीला सरकारने दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर एप्रिल-2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यात 7 श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला नि निर्धारित लक्ष्य 8 कोटीपर्यंत वाढविण्यात आले..
‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’अंतर्गत आतापर्यंत देशातील अनेक घरांमध्ये मोफत स्वयंपाकाचा गॅस पोहोचलाय. या योजनेअंतर्गत सरकारकडून लाभार्थ्यांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन, भरलेला गॅस सिलिंडर नि दोन बर्नरचा स्टोव्ह देण्यात येतो.
योजेनचा लाभ कोणाला मिळतो..?
‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’चा लाभ फक्त महिलांनाच दिला जातो. गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे असायला लागते. तसेच एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा जास्त कनेक्शन्स दिली जात नाहीत. ‘बीपीएल’ कुटुंबांनाच योजनेचा लाभ मिळतो.
आवश्यक कागदपत्रे
– उज्ज्वला योजनेसाठी ‘ई-केवायसी’ (E-KYC) केलेले असणे आवश्यक आहे.
– ओळखपत्र म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाते
– द्रारिद्य्ररेषेखालील कुटुंबांसाठी सरकारने दिलेले केशरी रेशनकार्ड, तसेच लाभार्थी कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रे.
– कुटुंबातील महिलेचा बँक खाते क्रमांक व बॅंकेचा आयएफएससी (IFSC) कोड बंधनकारक.
– पासपोर्ट आकाराचा एक फोटो.
असा करा अर्ज..!
– सुरुवातीला अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/en/ वर क्लिक करा.
– तुम्हाला विविध कंपन्यांच्या (इंडेन, भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) पर्याय दिसतील. सोयीनुसार पर्याय निवडा.
– होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करा.
– नंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.
– फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर व कॅप्चा कोड भरा.
– आता ओटीपी (OTP) जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.
– नंतर फॉर्म डाऊनलोड करा व जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीमध्ये तो सबमिट करा.
– कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाईल.
माहितीसाठी संपर्क
उज्ज्वला गॅस योजनेबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास सरकारने हेल्पलाइन नंबर आणि टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. त्यावर काॅल करु शकता..
हेल्पलाइन क्रमांक – 1906
टोल फ्री क्रमांक – 18002666696