छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली आहे. कपिल शर्मा याच्यासोबत या शोमध्ये भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर यांच्या विनोदाला मोठा प्रतिसाद मिळतो. विनोदाचे अफलातून टायमिंग, विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे, त्यांचे विनोदी किस्से.. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा शो सुपरहिट ठरला आहे.
बॉलिवूडमधील कलाकार असो की खेळाडू..अगदी नेतेमंडळीही या शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करीत असतात. असाच एक किस्सा भारताचा दिग्गज खेळाडू, माजी कॅप्टन विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी सांगितला होता. ‘द कपील शर्मा शो’मुळे विराटला चक्क तीन लाख रुपयांचा फटका बसला होता..
View this post on Instagram
Advertisement
काही दिवसांपूर्वी ‘द कपील शर्मा शो’मध्ये विराट आला होता. त्यावेळी त्याने हा किस्सा सांगितला होता. हा नेमका किस्सा काय होता, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..
नेमका किस्सा काय..?
‘द कपील शर्मा शो’मध्ये बाेलताना विराट म्हणाला, की ‘आम्ही एकदा एअरपोर्टवर प्लाईटची वाट पाहात थांबलो होतो. प्लाईटला वेळ लागल्याने मला खूप कंटाळा आला. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी ‘कपिल शर्मा शो’ पाहायचं ठरवलं, पण तेथे वायफाय नेटवर्क कनेक्ट होत नव्हते. त्यामुळे इंडियाच्या 3G सेल्यूलर नेटवर्कवरच तासभर ‘द कपिल शर्मा शो’ पाहिला.
काही वेळाने माझ्या भावाचा फोन आला. तो म्हणाला, तू काय करतोयस..? तुझ्या मोबाईलचं बिल 3 लाख रुपये आलंय…’ विराटचा हा किस्सा ऐकून शोमधील सर्व जण हसायला लागले. सध्या विराटचा हा किस्सा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा