SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात.. राष्ट्रगीत सुरु असताना विराटकडून गंभीर चूक..!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना चांगलाच रंगतदार झाला. मात्र, अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. टीम इंडियाला ‘क्लिन स्वीप’ देताना आफ्रिकेने 3-0 अशा फरकाने ही मालिका जिंकली.. भारतीय संघाच्या कामगिरीमुळे चाहते नाराज असतानाच, दुसरीकडे विराट कोहली वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलाय..

विराट नि वादाचे नाते जूनेच आहे.. तिसऱ्या सामन्यादरम्यान विराट कोहलीकडून एक गंभीर चूक झाल्याचे समोर आले. सोशल मीडियावर पाहता पाहता त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला नि नेटिझन्सने विराटला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
केपटाऊनमध्ये तिसरा वन-डे सामना झाला. त्यात कॅप्टन के. एल. राहुलने टाॅस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघ आपआपल्या देशांचे राष्ट्रगीत गाण्यासाठी मैदानात उतरले.

Advertisement

भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना, सर्व खेळाडू राष्ट्रगीत गात होते. मात्र, त्यावेळी विराट च्युइंगम चघळताना दिसून आले.. कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलमधून घेतलेल्या शॉटमध्ये विराट दोनदा दिसला. या दोन्ही वेळा तो च्युईंगगम चघळत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कपिल शर्मामुळे विराट कोहलीला 3 लाख रुपयांचा फटका, खुद्द विराटने सांगितला हा किस्सा..

Advertisement

अनेकांना विराटचे हे कृत्य अजिबात आवडलं नाही. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या विराटवर ‘बीसीसीआय’ने कारवाई करावी, अशी मागणी काहींनी केली आहे..

राष्ट्रगीताचा अवमान करण्याच्या कारणावरुन ‘ट्रोल’ होण्याची विराटची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही 2017 मध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरू असताना विराट च्युईंगगम चघळताना दिसला होता.

Advertisement

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचे इतर फलंदाज बाद होत असताना, विराटने 5 चौकारांसह 65 धावांची खेळी केला. मात्र, संघाला गरज असतानाच, तो केशव महाराजच्या बाॅलिंगवर बाद झाला नि त्यानंतर भारतीय फलंदाजी कोसळली. त्यामुळे तिन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement