SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी उत्साही दिवस जाईल. गुप्त शत्रूंकडे लक्ष द्या.

वृषभ (Taurus) : बजेट संतुलित करण्याचा विचार करू नका, अनावश्यक खर्च देखील होतील. जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. कामातून अपेक्षित कमाई कराल.

मिथुन (Gemini): उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. दिवस मनासारखा घालवाल.

कर्क (Cancer) : आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल. आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत.सिंह (Leo) : मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. संततीकडून शुभवार्ता समजतील. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.

कन्या (Virgo): घरातील कामात अधिक वेळ जाईल.
आध्यात्मिक आवड पूर्ण कराल. कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतात.

तूळ (Libra) : वडिलांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची राहील. तुम्ही जमा-खर्चाचे संतुलन साधण्यास सक्षम असाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल.

Advertisementधनु (Sagittarius) : अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नती होऊ शकते. मित्रांच्या ओळखीने काम होईल.

मकर (Capricorn) : घरात वरिष्ठ असतील तर तुमच्या बोलण्याचा प्रभाव घरातील लोकांवर पडू शकतो. या राशीच्या लोकांच्या आईच्या तब्येतीत चांगले बदल होतील,

कुंभ (Aquarius) : कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. शेअर्समधून अपेक्षित लाभ मिळू शकेल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळवाल.

मीन (Pisces) : आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल. रागावर नियंत्रण ठेवा.

Advertisement