सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार लवकरच एक बंपर गिफ्ट देणार आहे. त्यादृष्टीने नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येऊ शकते.
कोरोना महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यात (DA) वाढ केली नव्हती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत ‘डीए’चा दर 17 टक्के होता. त्यानंतर जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता वाढवून 28 टक्के करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये परत सरकारने महागाई भत्ता वाढवून 31 टक्के केला होता..
आता अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता तो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याच बरोबर घरभाडे भत्त्यातही (HRA) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रलंबित डीए मिळणार..
केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’ आहे. ती म्हणजे, या कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगानुसार, 18 महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता लवकरच दिला जाणार आहे. तब्बल 18 महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता भेटल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याचे बोलले जाते.
विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात.. राष्ट्रगीत सुरु असताना विराटकडून गंभीर चूक..!
वित्त मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जेसीएम (JCM) लवकरच बैठक घेणार आहे. त्यात महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी देण्यावर चर्चा होऊ शकते. ‘क्लास-1’ कर्मचाऱ्यांना 11,880 ते 37,000 रुपये, तर ‘क्लास-3’ कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये महागाई भत्त्याची थकबाकी मिळेल.
दरम्यान, केंद्रीय कर्मचार्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ केली जाऊ शकते. 2015 मध्ये सरकारने प्रसिद्ध केलेल्या मेमोरँडमनुसार, वाढत्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वेळोवेळी सुधारणा केली जाईल. आता घरभाडे भत्त्यात 3 टक्के वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.