शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने भारतात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. ऊस उत्पादनात जगाचा विचार केल्यास भारताचा दुसरा क्रमांक लागतो. उसाचे अधिकाधिक उत्पादन मिळावे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सतत संशोधन सुरु असते..
ऊस लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन व त्यातून उत्पन्न मिळत असले, तरी कधी कधी या पिकातही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. उसाच्या पिकावर अनेकदा रोगाचा प्रादुर्भाव होताे. त्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर होतो नि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते..
उसाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळावे, यासाठी त्यावर सतत संशोधन सुरु असते.. उत्तराखंडमधील पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांनी नुकत्याच उसाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, उसाच्या या जातीमध्ये रोग आणि कीटकांशी लढण्याची क्षमता चांगली आहे.
उसाच्या या जातीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते. पंतनगर विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या उसाच्या या तीन वाणाबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात.. राष्ट्रगीत सुरु असताना विराटकडून गंभीर चूक..!
उसाच्या तीन नव्या जातींबाबत..
पंत 12221 – कृषी शास्त्रज्ञांनी ऊसाच्या या जातीचे मूल्यमापन केले असता, त्यात असे आढळले की ऊसाच्या या जातीपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकेल. उसाच्या या जातीमध्ये उत्तम रस गुणवत्ता आहे. शेतकरी व साखर कारखान्यांसाठी ही विविधता फायद्याची असल्याचे मानले जाते..
पंत 12226 – ऊसाची ही जात विविध रोगांशी लढण्यास सक्षम आहे. शिवाय त्याची उत्पादन क्षमता खूप चांगली असून, लवकर पिकणारा हा वाण आहे. विशेष म्हणजे, जादा पाणी असेल किंवा दुष्काळप्रवण क्षेत्र.. दोन्ही ठिकाणी या वाणाचे पीक चांगले येते. त्यातून चांगले उत्पादन मिळते. या गुणांमुळे ही जात लागवडीसाठी खूप उपयुक्त असल्याचे मानले जाते.
पंत 13224 – उसाच्या या जातीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते. ऊसाची ही विविधता रोगमुक्त असून उच्च उत्पादनासाठी चांगली मानली जात असल्याचे सांगण्यात आले..