SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : घर, जमीन संबंधी निर्णय घ्या. फायदा होईल. प्रवास शक्यतो टाळावेत. मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे.

वृषभ (Taurus) : नोकरीत वर्चस्व सिद्ध कराल. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.मिथुन (Gemini) : कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल. तुम्ही स्वभावाने खूप परोपकारी आहात.

कर्क (Cancer): आज तुमचा दिवस इतरांच्या कामात आणि काळजीमध्ये जाईल. गुडघे, पाठ आणि कंबरदुखी बळावल्यास उपचार घ्यावेत.

सिंह (Leo) : नोकरी-व्यवसायात आपल्या पदाचा मान राखाल. गरजवंतांना संधी उपलब्ध करून द्याल. जोडीदारासह विचार छान जुळतील.

Advertisement


कन्या (Virgo): लोकांच्या हितासाठी केलेल्या कामाने लोकप्रियता लाभेल. व्यवसायातील चर्चा करताना रागावर ताबा ठेवा.

तूळ (Libra) : आज काही आव्हानात्मक काम कराल. मात्र शांत राहा. सहकारी वर्गाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय जाहीर कराल.

वृश्चिक (Scorpio) : मातृतुल्य व्यक्तींकडून आपुलकी मिळेल. गतकाळातील आठवणीत मन रमेल. मुलांना प्रेमासह शिस्तीचे धडे द्याल.

धनु (Sagittarius) : उत्सवाची तयारी करताना संयम ठेवा. अरेरावी करून चालणार नाही. उद्योगधंद्यात सुधारणा होईलमकर (Capricorn) : एकाच वेळी सर्व कामे पार पाडायचा प्रयत्न कराल. सकाळ उत्साही जाईल. जेवताना कटकटी होतील.

कुंभ (Aquarius) : सहलीचा योग येईल. लहान मुले आज जास्त हुशार वागतील. तब्येतीला जपा कारण आज दुखापत होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : गाव, शहर अशा चकरा कामानिमित्त कमी पण विनाकामी जास्त होतील. देवावर आज विश्वास निर्माण होईल.

Advertisement