SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरदार वर्गासाठी ‘गुड न्यूज’..! पीएफ खात्यातील रकमेबाबत मोठ्या निर्णयाचे संकेत..

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे. भविष्य निर्वाह निधी.. अर्थात ‘पीएफ’ (PF) खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरील कराबाबत मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली..

मोदी सरकारचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण त्यांच्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प यंदा सादर करणार आहेत. या बजेटकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. विशेषत: नोकरदार वर्गासाठी यंदाच्या बजेटमध्ये मोठे निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

नोकरदार वर्गाच्या ‘पीएफ’ खात्यात वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास, त्यावरील व्याजावर कर भरावा लागणार असल्याची घोषणा गेल्या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली होती.

दरम्यान, नंतर सरकारी कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील, त्यांना वर्षाला पाच लाखांपर्यंतच्या रकमेवर सूट मिळेल, असे सांगण्यात आलं. त्यानुसार, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात वर्षाला जमा होणाऱ्या 2.5 लाख रुपयांपर्यंत, तर सरकारी कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंत करमाफी मिळत होती..

Advertisement

मोदी सरकार ‘हा’ निर्णय घेणार
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा काही ठराविक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाच होत होता. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.. समानतेच्या हक्कांच्या विरोधात हा निर्णय असल्याचे म्हटले गेले..

दरम्यान, मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात ‘पीएफ’वरील करमाफीच्या रकमेची मर्यादा वाढविण्याची शक्यता आहे. आता सरसकट सर्वांनाच करमाफीचा फायदा दिला जाऊ शकतो.. हा मुद्दा प्री-अर्थसंकल्पीय चर्चेतही समोर आला. त्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतच्या पीएफ योगदानावर करमाफी देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते..

Advertisement

मोदी सरकारने असा निर्णय घेतल्यास, ‘पीएफ’ खात्यात वर्षाला पाच लाखांपर्यंत रक्कम जमा झाल्यास, त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यात सरकारी व खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश केला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे नोकरदार वर्गाचे आगामी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे…

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement