SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा’ पार्ट-2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अल्लू अर्जुन करणार पुन्हा एकदा धमाका..!

सध्या साऊथचा सुपर स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कोरोनाचा कहर सुरु असतानाही, या सिनेमाने बाॅक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. ‘पुष्पा’ सिनेमातील संगीत, गाणी, डायलाॅग, अॅक्शनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अल्लू अर्जुनच्या स्टाईलवर रसिक फिदा झालेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर हा सिनेमा हिंदी भाषेत आला नि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.. थिएटरसह आता ‘ओटीटी’ प्लॅटफाॅर्मवरही हा सिनेमा जोरात सुरु आहे. जगभरात 300 कोटींचा गल्ला या सिनेमाने कमावला आहे.

Advertisement

हिंदी मार्केटमध्ये या सिनेमाने जवळपास 80 कोटींचा गल्ला जमवला. ‘ओटीटी’वर रिलीज झाल्यावरही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील जादू कायम असल्याचे दिसते…

‘पुष्पा’ची हिंदी आवृत्ती आणण्यासाठी ‘गोल्डमाइन्स टेलिफिल्म्स’चे दिग्दर्शक मनीष शाह यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. अल्लू अर्जुनसाठी श्रेयस तळपदे याने केलेले डबिंग जबरदस्त झालेय.. या डायलाॅगलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

साऊथ चित्रपटाला हिंदीत प्रथमच इतका चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार, असा सवाल उपस्थित होत होता.. मात्र, याबाबत नुकताच मनीष शाह यांनीच खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या पुढच्या भागाबाबत माहिती दिली..

‘पुष्पा-द रुल’ पार्ट-2′ या नावाने हा सिनेमा येणार असल्याचे सांगून शाह म्हणाले, की या सिनेमाचे शूटिंग यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. लवकरच या चित्रपटाचे काम पूर्ण केल्यानंतर निर्माते त्याचा दुसरा भाग रिलीज करतील.

Advertisement

सिनेमा कधी रिलिज होणार?
हा सिनेमा कधी रिलीज होणार, त्यासाठी किती वेळ लागू शकतो, या प्रश्नावर ते म्हणाले, की ‘पुष्पा 2’ यावर्षी रिलीज होणार नाही, कारण या दीर्घ चित्रपटाच्या शूटिंगला वेळ लागणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाचे शूटिंग 210 दिवस चालले. ‘पुष्पा-2’चे शूटिंग जवळपास 250 दिवस चालू शकते.

शूटिंग संपल्यावरच हा सिनेमा कधी प्रदर्शित करायचा, हे निश्चित केले जाणार आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन किंवा काही वेगळीच अडचण आल्यास चित्रपट प्रदर्शित होण्यास आणखी वेळ लागू शकतो. मात्र, 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement