SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ‘मोठा’ बदल; ‘बीसीसीआय’कडून महत्वपूर्ण घोषणा..

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाने सपाटून मार खाल्ला.. कसोटी पाठोपाठ वन-डे मालिकाही यजमान दक्षिण आफ्रिकेने आपल्या खिशात घातली.. आता टीम इंडियापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ येत असून, या मालिकेत कॅप्टन रोहित शर्मा याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे..

दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने या दौऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार काही बदल करण्यात आले आहेत..

Advertisement

View this post on Instagram

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये 3 वन-डे व 3 टी-20 सामने होणार आहेत. ‘बीसीसीआय’ने या दोन्ही मालिकांसाठी आधीच वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 6 ठिकाणी या दोन्ही मालिका होणार होत्या, मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.. याबाबत ‘बीसीसीआय’ने शनिवारी (22 जानेवारी) निवेदन जारी केले.

फक्त दोनच ठिकाणी सामने
कोरोनाचा कहर सुरु असल्याने आता ही सगळी मालिका अहमदाबाद व कलकत्ता, अशा दोनच ठिकाणी खेळवली जाणार आहे. वन-डे मालिकेतील सामने अहमदबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत, तर टी-20 सीरीज कलकत्त्याच्या ‘ईडन गार्डन’वर होणार आहे. वेस्ट इंडिजची टीम 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे.

Advertisement

भारतीय संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर हा संघ जानेवारीअखेरीस भारतात येईल. या दौऱ्याची सुरुवात 6 फेब्रुवारीला वन-डे मालिकेने होणार आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून कलकत्ता येथे 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु होणार आहे..

वन-डे मालिकेतील अखेरचा सामना 12 फेब्रुवारीला खेळविला जाणार होता. मात्र, 12 व 13 फेब्रुवारीला ‘आयपीएल-2022’साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळे आता हा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे..

Advertisement

वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक
6 फेब्रुवारी – पहिली वन-डे
9 फेब्रुवारी – दुसरी वन-डे
11 फेब्रुवारी – तिसरा वन-डे (सर्व सामने अहमदाबाद)

16 फेब्रुवारी – पहिला टी-20
18 फेब्रुवारी – दुसरा टी- 20
20 फेब्रुवारी – तिसरा टी-20 (सगळे सामने कलकत्ता)

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement