SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रजनीकांत स्टाईल फिल्डींग.. आंद्रे रसेल विचित्र पद्धतीने रन आऊट.. क्रिकेट इतिहासात असं कधी पाहिलं नसेल, पाहा व्हिडीओ..!

क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे सांगता येणार नाही.. अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. त्या पाहिल्यावर कधी कधी स्वत:च्या डोळ्यावरही विश्वास बसत नाही. छोटीशी चूकही खेळाडूच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळाले आहे..

असाच काहीसा आश्चर्यकारक प्रकार बांगलादेश प्रीमियर लीग (BPL-2022)मध्येही दिसला.. वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑल राऊंडर आंद्रे रसेल विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. त्यामुळे त्याचा स्वत:चाही त्यावर विश्वास बसला नाही. सध्या त्याच्या रनआउटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Advertisement

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी (ता. 21) दोन सामने झाले. त्यातील दुसरा सामना ‘मिनिस्टर ग्रुप ढाका’ आणि ‘खुलाना टायगर्स’ यांच्यामध्ये झाला. त्यात ‘मिनिस्टर ग्रुप ढाका’ (MGD) संघाकडून आंद्रे रसेल खेळतो. आपल्या तडाखेबंद फटकेबाजीसाठी रसेल ओळखला जातो..

‘एमजीडी’ संघासह चाहत्यांनाही शुक्रवारी रसेल याच्याकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, त्याच्या बॅटने काही कमाल करण्यापूर्वीच तो विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. क्रिकेटच्या मैदानावर आतापर्यंत कोणीही असा रनआऊट झालेला नसेल.. त्यामुळेच या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

नेमकं काय झालं..?
‘मिनिस्टर ग्रुप ढाका’ची टीम पहिल्यांदा बॅटींग करीत होती. त्यात 15 ओव्हरमध्ये रसेल बॅटींगसाठी आला. ‘खुलाना टायगर्स’कडून ही ओव्हर थिसारा परेरा टाकत होता. रसेलने पाचव्या बॉलवर जोरदार सिक्स लगावत दमदार सुरूवात केली खरी, पण नंतर पुढच्याच बॉलवर जे घडलं, त्याची कुणीच अपेक्षा केली नसेल..

परेरानं टाकलेला शेवटचा बॉल रसेलनं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं टोलावला. धाव घ्यावी की नको, या विचारात असतानाच, दुसऱ्या बाजूने खेळणारा कॅप्टन मेहमुदुल्लाह याने त्याला ‘कॉल’ दिला. त्याला प्रतिसाद देत रसेलनेही धाव घेतली. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग करणाऱ्या मेहंदी हसन याने मेहमुदुल्लाह याला बाद करण्यासाठी स्टम्पच्या दिशेने थेट थ्रो केला.

Advertisement

विशेष म्हणजे, तो थ्रो थेट स्टम्पवर आदळला.. पण तोपर्यंत मेहमुदुल्लाह आपल्या क्रिजमध्ये सुरक्षित पोचला होता. मात्र, कहाणी इथेच संपत नाही. हसनने फेकलेला बॉल नंतर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या स्टम्पवर जाऊन आदळला. त्या बाजूला रसेल धावत होता. मात्र, आपल्याकडे थ्रो येणार नसल्याचे पाहून तो काहीसा निवांत रन घेत होता.

मेहंदी हसन याने एकाच थ्रोमध्ये दोन्ही बाजूंच्या बेल्स उडविल्या होत्या. त्यात मेहमुदुल्लाह तर वाचला, मात्र रसेल रन आऊट झाला.. ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. निराश मनाने रसेल याला डग आऊटमध्ये परतावे लागले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement