SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या रेशनकार्डबाबतची माहिती आता मोबाईलवर मिळणार..! इंटरनेटची गरज नाही..

देशातील कुठल्याही राज्यातून स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मोदी सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. ती म्हणजे, ‘वन नेशन-वन रेशन..’ कामानिमित्त सतत स्थलांतर करणारे मजूर व त्यांच्या कुटुंबांना प्रामुख्याने या योजनेचा लाभ होणार आहे. त्यांना देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात स्वस्त दरात रेशन घेता येणार आहे..

‘वन नेशन-वन रेशन’ मोहिमेंतर्गत देशातील नागरिकांना सुरळीत स्वस्त धान्यपुरवठा व्हावा, यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांना रेशनकार्डबाबत महत्वाची माहिती मिळावी, अन्नपुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, ग्राहककेंद्री व्हावी, यासाठी केंद्र सरकारने एक संकेतस्थळ, तसेच ‘मेरा रेशनकार्ड’ अ‍ॅपची निर्मितीही केली.

Advertisement

मात्र, ग्रामीण भागात अनेकदा नेटवर्क मिळत नाही. तसेच शहरी भागातील अनेक ग्राहकांना आजही व्यवस्थित मोबाईलही हाताळता येत नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना रेशनकार्डबाबत ऑनलाइन माहिती मिळवणे अशक्य होत होते. ही बाब लक्षात घेऊन, सरकारने आता रेशनकार्डधारकांना महत्त्वाच्या अपडेट्स मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येणार आहेत.

ग्राहक सेवेत सुलभता आणण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डबाबतची महत्त्वाची माहिती आता ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. अर्थात त्यासाठी संबंधित रेशनकार्डधारकाचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डसोबत लिंक केलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी तातडीने आपला मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी लिंक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

रेशनकार्डशी मोबाईल नंबर कसा लिंक करणार..?
– सुरुवातीला https://nfsa.gov.in/State/MH या संकेतस्थळावर जा.
– या संकेतस्थळावर ‘अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर’ या पर्यायावर क्लिक करा, त्याखाली चार बॉक्स दिसतील..
– ‘आधारकार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड/एनएफएस आयडी’ या पहिल्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाका.
– पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा. तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.
– सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करा, तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement