SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार..!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कपचा कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवता येणार आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप म्हटलं, की एका गोष्टीची जोरदार चर्चा होते, ती म्हणजे भारत-पाकिस्तान सामना.. आयसीसीच्या स्पर्धांमध्येच हे दोन्ही संघ आमने-सामने येत असल्याने चाहत्यांना या सामन्याची मोठी उत्कंठा लागलेली असते. दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर मॅचआधीच एक युद्ध रंगलेले असते..!

Advertisement

यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही भारत व पाकिस्तान यांचा समावेश एकाच गटात आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये जोरदार मुकाबला पाहायला मिळणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर 23 ऑक्टोबर रोजी हे दोन्ही संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाक संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाली आहे.

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान खेळविला जाणार आहे. श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा पहिल्या टप्पा सुरु होणार आहे. या चार संघांमधून दोन संघ सुपर-12 साठी पात्र ठरणार आहेत..

Advertisement

टीम इंडियाचे सामने
23 ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध
27 ऑक्टोबर- ‘अ’ गटातील उपविजेता
30 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका
2 नोव्हेंबर – बांग्लादेश
6 नोव्हेंबर – ‘ब’ गटातील विजेता

टी-20 वर्ल्ड कपचे सगळे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी अशा 7 ठिकाणी होणार आहेत. अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. उपांत्य फेरीचे सामने 9 व 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान व अॅडलेड, ओव्हल येथे होणार आहेत.

Advertisement

सामन्यांसाठी तिकिटांची विक्री 7 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. टी-20 वर्ल्ड कपचा हा आठवा हंगाम आहे. भारताने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement