SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गरोदर वनरक्षकाला माजी सरपंचाकडून बेदम मारहाण, त्या दिवशी नेमकं काय घडलं, पाहा व्हिडीओ..!

सातारा जिल्ह्यातील एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने गरोदर महिला वनरक्षकाला बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या मारहाणीत त्याची पत्नीही त्याला मदत करीत असल्याचे दिसते..

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर आता या घटनेतील दोन्ही आरोपींना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, नेमकं त्या दिवशी काय झालं होतं, या घटनेआधी काय घडामाेडी घडल्या होत्या, नेमकं हे प्रकरण काय आहे.. हे सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकी घटना काय..?
साताऱ्याच्या वन विभागाच्या कार्यालयात सिंधू सानप व सूर्याजी ठोंबरे हे वनरक्षक दाम्पत्य नोकरीला आहे. तीन महिन्यांच्या गरोदर असलेल्या सिंधू सानप यांची 4 महिन्यांपूर्वीच या कार्यालयात बदली झाली होती.

Advertisement

पळसवडे येथील रामचंद्र जानकर हा माजी सरपंच व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र, सिंधू सानप येथे रुजू झाल्यापासून जानकर व त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. वन विभागाच्या कामाचे चेक सोडत नसल्याने जानकर याने अनेकदा सानप यांना धमकावले होते.

सध्या प्राणी गणनेचे काम सुरु आहे. या कामासाठी 17 जानेवारीला दोन कामगार घेऊन गेल्याने, जानकर याची पत्नीने सिंधू सानप यांना मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्यांनी पती सूर्याजी यांना माहिती दिली. त्यानंतर 19 जानेवारीला प्राणी गणेनेचे काम झाल्यानंतर परत येताना, जानकर याने सूर्याजी यांना अडविले.

Advertisement

‘मजूर महिलांना मला न विचारता का नेले’ अशी विचारणा करीत जानकर याच्या पत्नीने सूर्याजी यांना चपलेने मारण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडवण्यासाठी सिंधू सानप मध्ये पडल्या असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, सूर्याजी यांनी आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्या घटनेचे शूटींग केले.

आदित्य ठाकरे यांच्याकडून दखल
सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्याची दखल घेत, अशा प्रकारचे कृत्य खपवून घेणार नाही. आरोपीला कडक शासन करण्याचा इशारा दिला होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या घटनेची दखल घेत, सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले.

Advertisement

या घटनेनंतर जानकर पती-पत्नी फरार झाले होते. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत असताना, 19 जानेवारीला रात्री 3 च्या सुमारास पोलिसांनी जानकर याला शिरवळ येथे अटक केली. त्यानंतर 20 जानेवारीला त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. या दोघांना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केल्याचे अपर पोलिस अधीक्षक अजित बोराडे म्हणाले.

Advertisement

जानकर यांच्या मारहाणीत सानप यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्या 3 महिन्यांच्या गरोदर असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नव्हता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement