SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोज 250 रुपये गुंतवा नि 62 लाख रुपये मिळवा, सरकारच्या ‘पीपीएफ’ योजनेतून मोठा लाभ..

सुरक्षेच्या कारणांमुळे हल्ली नेमकी गुंतवणूक कुठे करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या घामाचे दाम लूटले तर जाणार नाही ना, त्यातून चांगला परतावा मिळेल का, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण होते. मात्र, अशा काही योजना आहेत, ज्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच, शिवाय चांगला परतावाही मिळतो..

अशीच एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, ती म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.. अर्थात ‘पीपीएफ’ (PPF). या योजनेची हमी सरकार घेते. त्यामुळे सुरक्षेचा काही प्रश्नच नाही. सुरक्षेसोबतच भरघोस परतावा नि कर लाभांमुळे ही योजना गुंतवणूकीसाठी सर्वात चांगला पर्याय ठरली आहे.

Advertisement

निवृत्तीनंतर गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. अर्थ मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने 1968 मध्ये पहिल्यांदा ‘पीपीएफ’ योजना सादर केली. केंद्र सरकारच्या हमीमुळे ही योजना 100 टक्के जोखीममुक्त आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा त्यावर कुठलाही परिणाम होत नाही.

कसा फायदा होतो..?
‘पीपीएफ’ योजनेत गुंतवणूकदार सलग 15 वर्षे पैसे गुंतवू शकतात. 15 वर्षांनंतरही पैशांची गरज नसल्यास ‘पीपीएफ’ खात्याचा कार्यकाळ वाढविता येतो. योजनेत गुंतवणूक बंद झाली, तरी लगेच पैसे काढण्याची घाई करू नका. त्यावर 7.1 टक्के व्याज मिळते. सध्या हा सर्वाधिक व्याजदर असून, त्याला सरकारची हमी आहे.

Advertisement

गुंतवणूकदाराने ‘पीपीएफ’ योजनेत वर्षाला दीड लाख रुपये 15 वर्षांसाठी गुंतवल्यास कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुमारे 41 लाख रुपये गुंतवणूकदाराला मिळतात.

..तर 62 लाख मिळणार..
‘पीपीएफ’ खात्यात रोज 250 रुपये गुंतवल्यास महिनाअखेर 7,500 रुपये, तर वर्षाला 91,000 रुपयांपेक्षा थोडी जास्त गुंतवणूक होते. वयाच्या 25 व्या वर्षांपासून गुंतवणूक करीत गेल्यास 25 वर्षांनंतर, म्हणजेच वयाच्या 50 व्या वर्षी या याेजनेतून तब्बल 62.5 लाख रुपये मिळतात. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. आपण 25 वर्षांत 22.75 लाख रुपये जमा करतो, तर त्यावर सुमारे 40 लाख रुपये व्याज मिळते..

Advertisement

समजा, इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवणे अशक्य असल्यास कमी रक्कमही गुंतवता येते. गुंतवणुकदार दरवर्षी अगदी 500 रुपयांपर्यंत कमी गुंतवणूक करू शकतात. ‘पीपीएफ’ खाते ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या बॅंकेतही उघडता येत असल्याचे सांगण्यात आले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement